पब्लिक पोस्ट आर्णी(इचोरा) प्रेम युगलांची आत्महत्या दिवसेंदिवस आधुनिक युगातील प्रेमप्रकरणं मोठ्या प्रमाणात घडत ...
पब्लिक पोस्ट
आर्णी(इचोरा)
दिवसेंदिवस आधुनिक युगातील प्रेमप्रकरणं मोठ्या प्रमाणात घडत असून आता आणाभाका आणि वचनाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आत्महत्येचा धाडसी निर्णय सुद्धा प्रेमीयुगुलाने घेण्याचे अनेक प्रकरणे आता यवतमाळ जिल्ह्यात घडत आहेत. विशेष म्हणजे निरागस असणाऱ्या प्रेमामध्ये घडलेल्या या गोष्टी अत्यंत भविष्यासाठी विदारक आणि धोकादायक असून याला सामाजिक व्यवस्थेचा विरोध सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या तरुण वयातील मुलामुलींना कौन्सिलिंगची अत्यंत गरज असल्याचे सुद्धा समोर आले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार
पोलीस ठाणे पारवा अंतर्गत सावळी दूरक्षेत्र मधीलग्राम गूढा तालूका आर्णी येथील गिढाई टेकडी जवळ ,यूवक- विशाल दत्ता आगीरकर ,वय 28 रा. राणीधनोडा ,आर्णी व यूवती कू. पूनम संजय राऊत वय 18 रा. बोंडगव्हाण ता .माहूर जि. यवतमाळ यांनी दि 15 चे रात्री ते 16 डिसेंबर चे सकाळ दरम्यान विषारी औषध प्राषन करून आत्महत्या केली. सदर आत्महत्ये बाबत पारवा पोलीस ठाणे मधे गूढा गावचे पोलीस पाटील नितीन खोडे यांनी दिलेल्या माहिती वरून आकस्मिक मृत्यू दाखल झालेला असून ,याबाबत चौकशी सूरू आहे. पारवा पोलीस तपास करीत आहेत.
No comments