यवतमाळ - पब्लिक पोस्ट दिग्रसच्या वैभवात भर घालणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे नाट्यगृह आमदार संजय राठोड यांच्या संकल...
यवतमाळ -
पब्लिक पोस्ट
दिग्रसच्या वैभवात भर घालणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे नाट्यगृह आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस येथे साकारत आहे. या नाट्यगृहाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ शनिवारी २५ डिसेंम्बरला रोवण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची ' हास्य जत्रा' फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
जुने बसस्थानक येथील टाऊन हॉलच्या जागी नव्यानेच निर्माण होत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी आमदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेत सकाळी ११ वाजता होणार आहे . आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस नगर परिषदेच्या वतीने या नाट्यगृहाचे काम होणार असून शहराच्या वैभवात एक आणखी एका वास्तूची भर पडणार असल्याने नाट्यकलावंत , नाट्यप्रेमी , व्यापारी व नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार प्राजक्ता माळी, अरुण कदम, समीर चौगुले हे आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments