यवतमाळ (प्रतिनिधी) पब्लिक पोस्ट ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशनच्या बाभुळगाव तालुका अध्यक्षपदी शिक्षण विकास कनिष्ठ महाविद्या...
यवतमाळ (प्रतिनिधी)
पब्लिक पोस्ट
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशनच्या बाभुळगाव तालुका अध्यक्षपदी शिक्षण विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. गजानन कोवे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी तालुक्याचे सचिव म्हणून अमोल सलामे, उपाध्यक्ष विष्णू दुर्वे, सहसचिव प्रा. रेखा मसराम, कोशाध्यक्ष विजयश्री वेट्टी, प्रसिद्धीप्रमुख सदाशिव तोडसाम, तर महिला प्रतिनिधी म्हणून वैशाली परतेती, मालू आत्राम व मोसमी कुळसंगे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. प्रा. हरीश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या वेळी राज्याचे उपाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे ,केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश कन्नाके, जिल्हा सचिव किशोर उईके, राज्याचे कार्याध्यक्ष सुरेश चिंचोळकर तसेच यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये शासकीय निमशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मागण्या व हक्कांसाठी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन ही संघटना सातत्याने लढत असून बाभूळगाव तालुक्यांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
No comments