उमरखेड : नगर परिषद अंतर्गत सन 20 18 पासून पंतप्रधान आवास योजनेच्या 90 लाभार्थ्यांच्या खात्यातून प्रत्येकी 29 हजार र...
उमरखेड :
नगर परिषद अंतर्गत सन 20 18 पासून पंतप्रधान आवास योजनेच्या 90 लाभार्थ्यांच्या खात्यातून प्रत्येकी 29 हजार रुपये रक्कम अनाधिकाराने परस्पर काढून लाभार्थ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित बँक प्रशासन व नगर परिषद प्रशासनाविरुद्ध पोलीस कार्यवाही करावी अशी मागणी छ.शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीच्या वतिने दि . 29 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली .
उमरखेड नगर परिषदेमार्फत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 90 लाभार्थ्यांच्या खात्यातून नियमबाह्य पद्धतीने प्रत्येकी 29 हजार रुपये परस्पर काढले असल्याच्या आरोप करित संबंधित लाभार्थ्यांनी मागील वर्षीं 19 दिवस आमरण उपोषण केले होते . छ . शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी शोलेस्टाईल आंदोलन सुद्धा केले होते . त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही नाही . छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीकडून गरीब घरकुल धारकांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे . सदर प्रकरणाची उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरु झालेली असून यावरही राजकीय दबावातून योग्य कार्यवाही न झाल्यास न्यायालयात जाण्याची आमची तयारी असल्याचे पत्रकार परिषदेत समितीचे मार्गदर्शक विलासराव चव्हाण यांनी सांगीतले .यावेळी नगर परिषद प्रशासन व बँक प्रशासनाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यां विरुद्ध पोलीस कार्यवाही व्हावी अशी मागणी विलासराव चव्हाण यांच्यासह समितीचे अध्यक्ष देविदास शहाणे, सचिव गजानन देशमुख , सुनिल शहाणे बसवेश्वर क्षीरसागर अमोल मोरे व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केली आहे .
No comments