विद्यमान परिस्थितीमध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुकीचे वारे सगळीकडे गाजत आहे.असे असताना भारती...
विद्यमान परिस्थितीमध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतच्या
निवडणुकीचे वारे सगळीकडे गाजत आहे.असे असताना भारतीय जनता पार्टी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व मुख्य पदाधिकारी यांनी बाबुळगाव तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचा झंझावात गावागावात पोहोचणारे माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्वांनी आपल्या हाताला शिवबंधन बांधले.विशेष म्हणजे शिवसेनेने बाबुळगाव या तहसील पासूनच आपल्या कार्याची सुरुवात केली.
यवतमाळ जिल्ह्याचे राजकीय समीकरण आता हळूहळू बदलायला लागले आहे. एकीकडे यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती बघता महाविकासआघाडी मध्ये असणारे आमदार संजय राठोड हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावानपणे कार्य करीत असतांना त्यांनी शिवसेना घरादारा पर्यंत पोहोचविण्याचा एक मोठा संकल्प सुद्धा उराशी घेतला आहे.मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांचे गल्लीपासून तर मातोश्री पर्यंतचे प्रवेश सुद्धा सातत्याने सुरू ठेवले. त्यामुळे शिवसेनेचे बळ जिल्ह्यामध्ये वाढावे आणि शिवसेनेला उभारी मिळावी याकरिता सातत्याने त्यांचे प्रयत्न राहिले आहे. असे असताना बाबुळगाव तालुक्यातील विरोधी पक्ष व सत्य तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला प्रवेश हा यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणाची नवी नांदी राहू शकते का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
बाभूळगाव येथे २१ डिसेंबरला होत असलेल्या नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठी उलथापालथ झाली . भाजप , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अनेक आजी , माजी पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी आज शिवसेना नेते आमदार संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेत शिवबंधन बांधले .नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने बाभूळगावात पक्षाची ताकद वाढली आहे .शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नुकत्याच झालेल्या अनेक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर खुश आहे.त्या अनुषंगाने गावोगावी शिवसेनेकडे अनेक राजकीय कार्यकर्ते आकर्षित होत आहे.विशेष म्हणजे नगरपंचायत , नगर परिषद क्षेत्रात विकासकामे मार्गी लावणारे नगरविकास खाते हे शिवसेनेकडे आहे.शिवसेना नेते ना .एकनाथ शिंदे हे सध्या नगरविकास मंत्री आहेत . यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संदीपान भुमरे तर माजी मंत्री संजय राठोड हे शिवसेनेचे जिल्ह्याचे कार्यकुशल नेतृत्व आहे .त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेकडे आज निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा ओढा वाढला आहे .
बॉक्स
शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय राठोड यांनी दैनिक पब्लिक पोस्टला आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसेना ही जिल्ह्यामध्ये जेवढी सक्षम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहेत. आणि पूर्ण केली जाईल. विशेष म्हणजे विदर्भातील सर्वच ठिकाणी चांगले उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीत आम्ही आहोत. यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरण निश्चितच प्रेरणादायी राहणारे आहेत. विशेष म्हणजे मातोश्रीने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असून जिल्ह्यामध्ये असणारा तळागळातील वर्ग ज्याचे राजकारणात कुणीच वाली नाही, अशा वर्गाला एकत्रित करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्याची ही माझी धडपड सातत्याने सुरू राहिली आहे. आणि ती राहील. विशेष म्हणजे दिग्रस मतदार संघामध्ये केलेले कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्याची दखल सुद्धा तेवढेच मोठ्या प्रमाणात घेतली जाईल याची सुद्धा शाश्वती आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला विधानसभेमध्ये पाठविले आहेत. त्यामुळे मी त्या प्रश्नावर सातत्याने लढत असतो.ते लढून सरकारकडून मार्गी लावून सुद्धा प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे बाबुळगाव तालुक्यांमध्ये असणारा महत्त्वपूर्ण बेंबळा प्रकल्पाचा प्रश्न व बाबुळगाव शहराच्या विकासात्मक दृष्टिकोन यातून निश्चितच आम्ही आगळेवेगळे पाऊल उचलणार आहोत.
No comments