Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

आर्मी डे दिनी पुलगाव येथे बोरीअरब येथील शहीद सैनिक देविदास तायडे यांच्या पत्नीचा सन्मान

आशिष सावंकार (बोरी अरब प्रतिनिधी-)    "ऐ मेरे वतन के लोगो , जरा आखो मे भरलो पानी,  जो शहीद हुए हैं उनकी  जरा याद करो कुर्बानी, " ...


आशिष सावंकार (बोरी अरब प्रतिनिधी-) 
 "ऐ मेरे वतन के लोगो ,
जरा आखो मे भरलो पानी,
 जो शहीद हुए हैं उनकी
 जरा याद करो कुर्बानी, "
या गीताच्या ओळी कळत -नकळत कानावर पडताच डोळ्यातून अश्रू ओघळल्या शिवाय राहत नाही. आज' आर्मी डे' च्या दिनी शहीद जवानांचा सत्कार समारंभ दिनी कळत-नकळत शहिद विर सुपुत्रांच्या आठवणीला उजाळा देत अश्रू अनावर होतानाचे चित्र दिसून आले.आज  पुलगाव येथील कार्यक्रमात बोरी अरब येथील प्रथम शहीद सैनिक देविदास सेवकदास तायडे यांच्या वीरपत्नी अंजनाबाई देविदास तायडे यांच्या सत्कार समारंभ संपन्न झाला.
आर्मी डे च्या दिवशी जिल्हा यवतमाळ तालुका दारव्हा मु. पो. बोरी अरब येथील प्रथम शहीद सैनिक देविदास सेवकदास तायडे यांच्या विर पत्नी अंजनाबाई देविदास तायडे यांचा या दिनी आर्मी विभागाचे ब्रिगेडियर विनय नागर तसे ए डी एम कमांडर कुळकर्णी पुलगाव कॅम्प. भारतीय सैनिक व अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वागत व सत्कार संपन्न यावेळी बोरीअरब येथील विरपत्नी अंजनाबाई देविदास तायडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच परीवरासंबंधी संपूर्ण माहिती प्राप्त केली. यावेळी आर्मी विभागाने त्यांची यथायोग्य माहिती जाणून घेतली. शहीद सेवकदास तायडे यांचे चिरंजीव विजय तायडे ,संजय तायडे तसेच पंडित तायडे यांनी सहविस्तार पूर्वक माहिती दिली. याप्रमाणे आर्मी डे सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या स्मृती कायम स्मरणात राहील.

1 comment

  1. JTG Hospitality Inc - Casino & Hotel - Kansas City
    JTG 진주 출장마사지 Hospitality 충청북도 출장안마 Inc is located in 공주 출장샵 Kansas City, Kansas City. See full details about its products. See product information and 의왕 출장안마 contact 군포 출장안마 JTG Hospitality.

    ReplyDelete