पब्लिक पोस्ट ब्युरो घाटंजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ...
पब्लिक पोस्ट ब्युरो
घाटंजी
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेल चे उद्घाटन प्रा. डॉ. उदय नावलेकर ,प्राचार्य, आबासाहेब पारवेकर महाविद्यालय यांनी केले.
प्रसंगी त्यांनी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सकारात्मकता, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य यांचे महत्त्व रंजकपणे सांगीतले.
याप्रसंगी युवा सिनेकलाकार, टि. वी. कलावंत निखिल राठोड यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त गुणांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले.
संस्थेचे शिल्पनिदेशक सचिन पांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांचा एकूणच व्यक्तीमत्व विकास होऊन त्यांच्यामध्ये सर्व बाबतीत निश्चितच आत्मविश्वास निर्माण होऊन पुढील करीयर मध्ये विध्यार्थ्यांना यशस्वी होण्यात फायदेशीर होईल यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा ठरला. तसेच या उपक्रमा अंतर्गत सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शना मुळे प्रशिक्षणार्थींना इस्त्रो, डीआरडीओ ,ओएनजीसी , हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ,ऑडनस फॅक्टरी, इंडियन रेल्वे , नॅशनल थर्मल पावर स्टेशन, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर ,डब्ल्यूसीएल व ईतर भारत सरकार तथा भारत सरकारचे उपक्रमातील आस्थापना तसेच ईतर नामांकित कंपनी इत्यादीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या अँप्रेटीस तथा रोजगाराच्या निवडीसाठी फायदा होईल , असे मत संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. दिव्या मेश्राम या विद्यार्थ्यीनीने केले.
संस्थेतील सर्व गटनिदेशक तथा निदेशकांच्या सहकार्याने हा उपक्रम संस्थेत राबविला जाणार आहे .
No comments