यवतमाळ- यवतमाळ जिल्हा काँगेस कमिटी द्वारा आयोजित असंघटीत कामगारांच्या महानोंदणी अभियान इ- श्रम कार्ड ला कामगारांचा प्रचंड प्रत...
यवतमाळ-
यवतमाळ जिल्हा काँगेस कमिटी द्वारा आयोजित असंघटीत कामगारांच्या महानोंदणी अभियान इ- श्रम कार्ड ला कामगारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
15 जानेवारी 2022 ला येथील पवारपुरा आणि इंदिरा नगरमध्ये सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत हे महानोंदणी अभियान राबविण्यात आले. यामध्ये यवतमाळसह परिसरातील छोटे आणि सिमांत शेतकरी, शेतमजूर, पशुपालन करनेवाले, बीडी कामगार, बांधकाम कामगार, सेंट्रींग कामगार, लेदर कामगार, सुतार, विटभट्टी कामगार, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेता, फळ विक्रेता, वृत्तपत्र विक्रेता, हातगाडी ढकलनेवाले, ऑटो रिक्षा चालक, आशा कामगार, दुध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्र चालक, स्थलांतरीत कामगार सहभागी झाले होते. इ- श्रम कार्ड बनिवण्याकरीता लागणारे 50 रूपये हे नागरीकांचा यावेळी घेण्यात आले नाही. हा संपूर्ण खर्च यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीकडून करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव जावेद परवेज अंसारी स्वत: हजार होते. त्यांनी उपस्थित नागरीकांना व कामगारांना मार्गदर्शन करून ई श्रम कार्डचे महत्व आणि फायदे समजावून सांगीतले. सोमवार 17 जानेवारी आणि मंगळवार 18 जानेवारीला सुध्दा इ श्रम कार्ड महानोंदणी शिबीर येथील नगरसेवक जावेद अंसारी संपर्क कार्यालय, तारपुरा मस्जीद समोर शिंदे नगर येथे आयोजित केले असल्याची माहिती अंसारी यांनी दिली. सर्व असंघटीत कामगारांनी या महानोंदणी अभियानात सहभागी होवून ई श्रम कार्ड बनविण्याचे आवाहन केले.
जावेद अन्सारी
चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस
No comments