Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने अंतर्गत अखेर केळझरा को. गावाची निवड

अबीद फानन आर्णी(पब्लिक पोस्ट) सरपंच रमेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम या योजन...

अबीद फानन
आर्णी(पब्लिक पोस्ट)
सरपंच रमेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम या योजनेअंतर्गत राज्यातील १४६ गावांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १६ गावांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी आर्णी तालुक्यातुन केळझरा कोमटी/केळझरा वरठी हि दोन गावे असल्यामुळे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण  यांच्यासमोर कोणत्या गावांची निवड करावी असा संभ्रम निर्माण झाला होता तेव्हा सरपंच रमेश चव्हाण यांनी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सदर सदर गावाची निवड केंद्र शासनाच्या आदेशामध्ये ऑनलाइन प्रणालीद्वारे गावाचा सांकेताक क्रमांक ५४३२८६ हा केळझरा को.या गावाचा असल्याने केळझरा को. या गावांची निवड करण्यात यावी शासनाकडून प्राप्त 21 लक्ष रुपये गावाकरिता मंजूर होऊनही प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मूलभूत सुविधा निर्माण करणे ग्राम समिती गठित करणे पाच वर्षाचा विकास आराखडा तयार करणे अपेक्षित असताना कोणतीही कार्यवाही झाली नाही अशी लेखी तक्रार देण्यात आली होती सदर तक्रारीवरून दिनांक 6 12 21 रोजी माननीय आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ यांना सूचना दिल्या की, यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील केळझरा को. या गावाची निवड करण्यात आलेली आहे,शासन निर्णयामध्ये ज्या गावाकरिता मंजूर करण्यात आलेला निधी सदर गावाकरिता खर्च करण्यात यावा, सदर गाव प्रस्तुत योजनेतून वगळण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश दिल्याने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सरपंच सचिव यांना काल दिनांक १४/१/२२ रोजी पत्र देऊन आदर्श ग्राम योजनेअंतर्गत अहवाल सादर करण्याचे सुचविले आहे त्यामुळे सरपंच रमेश चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे निर्भळ यश प्राप्त झाल्यामुळे नागरिकांकडून सरपंच यांचे कौतुक होत आहे व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे
 "प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मागील वर्षी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडुन माझ्या गावातील कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते कारण गावाचा सांकेताक क्रमांक माझ्या गावाचा होता याची मला कल्पना होती त्यामुळे सदर विषय मी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लावुन धरला व मा.आयुक्त समाजकल्याण पुणे यांनी मान्य केली आहे सदर योजनेअंतर्गत गावाचा मोठा विकास होईल..
... सरपंच ग्रा.प.केळझरा को."

No comments