यवतमाळ पब्लिक पोस्ट दि फेडरेशन ऑफ हेडमास्टर असोसिएशन रजि.318 अमरावती,विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ संलग्...
यवतमाळ
पब्लिक पोस्ट
दि फेडरेशन ऑफ हेडमास्टर असोसिएशन रजि.318 अमरावती,विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ संलग्न असलेल्या यवतमाळ जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ शिवानंद गुंडे यांचा सत्कार करण्यात आला.व सहविचार सभा घेण्यात आली .या सभेत पुढील विषय चर्चेला घेण्यात आले.यावेळी वर्ग 10 वी व 12 वी चे वर्ग सुरू करण्यात यावे . जी पीएफ चिठ्ठी लवकर करण्यात यावे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पेन्शन संबंधित बिले त्वरित काढावे. मेडिकल बिल बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली . या सभेला विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सुरेंद्र कडू , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अविनाश रोकडे , कार्याध्यक्ष अजय खैरे, उपाध्यक्ष दयालाल भोयर, सहसचिव मनोज जिरापूरे , खारकर , ताजने कोषाध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते. सभा संपन्न झाली व निवेदन देण्यात आले.
No comments