यवतमाळ: जिल्हा शल्य चिकित्सकलय सामान्य रुग्णालय यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या परिचारिका ए एन एम वस्तीगृह येथे शिकत असलेली निकिता कैला...
यवतमाळ:
जिल्हा शल्य चिकित्सकलय सामान्य रुग्णालय यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या परिचारिका ए एन एम वस्तीगृह येथे शिकत असलेली निकिता कैलाश राऊत हिचा बळी तेथील अनिता राठोड ,स्वाती जारुंडे आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे झाला तिची प्रकृती अतिशय वाईट असताना सुद्धा तेथील राठोड यांनी तिला रुग्णालयात दाखल केले नाही. तिची प्रकृती अजूनच बिकट झाली आणि त्या दरम्यान तिचा वस्तीगृहात मृत्यू झाला असा आरोप पीडित कुटुंबियांनी तेथील कर्मचाऱ्यावर लावला आहे. ही घटना लपवण्यासाठी येथील संबंधित कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले असेही बोलले जाते. याच विषयाला संभाजी ब्रिगेड न्याय देण्यासाठी आज अमोल येडगे जिल्हाअधिकारी यवतमाळ यांना तक्रार दिली. त्यांच्यासोबत पीडितांचे वडील कैलाश राऊत व आई होते तेव्हा पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी ्या लापरवाही कर्मचार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व अनुग्रह निधी मदत शासनाकडून देण्यात यावी पीडितांच्या लहान बहिणीला व विकलांग भावाच्या शिक्षणासाठी सर्व खर्च हा सरकारने उचलावा तसेच पीडितांच्या घरची एक व्यक्ती हे शासकीय नोकरीवर घ्यावी या सर्व मागण्या घेऊन संभाजी ब्रिगेड जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले .लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक पवित्रा घेणार हेसुद्धा सांगण्यात आले. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ खोब्रागडे सचिन मनवर , शुभम पाथोडे ,सुरज पाटील ,जुनेद सय्यद, अमोल गावंडे,अक्षय बोरकर , स्वप्नील पुनवटकर, किशोर ठाकरे , प्रशांत कदम ,नितीन काळे,प्रशांत ठाकरे, निलेश राठोड ,उमेश मसराम ,सम्राट , प्रतीक नाईक, शेकडो संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते हजर होते.
No comments