वाशिम दि.१९:(जिल्हा प्रतिनिधी ) दि.18 मार्च रोजी आम्ही पो.नि. अनिल ठाकरे पो.स्टे . धनज बु असे नापोकॉ 841 सह धुलीवंदन बंदोबस्त...
दि.18 मार्च रोजी आम्ही पो.नि. अनिल ठाकरे पो.स्टे . धनज बु असे नापोकॉ 841 सह धुलीवंदन बंदोबस्ता दरम्यान पेट्रोलींग ड्युटी करीत असतांना गोपनिय माहीतीगार यांचेकडुन खात्रीशिर माहीती मिळाली की अमरावती कडुन नागझरी मार्गे कारंजा लाड कडे चार ते पाच पांढर्या रंगाचे पिकअप वाहनामध्ये गोवंश दाटीवाटीने कोंबुन व जनावराचे पाय व तोंड बांधुन जनावराची वाहतुक करुन कारंजा लाड कडे जात आहे .
या गोपनिय खबरीवरुन आम्ही ओ.पी. कामरगाव इंचार्ज पोउपनि राठोड यांना वरील माहीती देवुन त्यांना त्वरीत नाकाबंदीकरीता हजर येण्याचे कळविले असता पोउपनि राठोड हे पोकॉ 871 यांचेसह अमरावती खेर्डा रोडवर नाकाबंदी करीता कामरगाव येथील शेतकरी भवन जवळ रोडवर हजर आले आम्ही कामरगाव येथील शेतकरी भवन जवळ रोडवर पो.स्टाफ चे सह नाकाबंदी लावुन संशयीत वाहने चेक करीत असतांना एका पाठोपाठ पांढर्या रंगाची पिकअप सारखे दिसनारे वाहन नाकाबंदीचे दिशेने येतांना दिसले सदर वाहनांना बरीकेट साह्याने व पो.स्टाफ चे मदतीने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता . 1 ) महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र . MH 32 Q 4975 चा चालक शेख मुमताज शेख युसुफ वय 40 वर्षे रा . तालुका वलगाव जिल्हा अमरावती याने सदर वाहनामध्ये पांढर्या रंगाचे 2 व लाल रंगाचे 4 गोरे प्रत्येकी किं . 15,000 / -रु असा एकुण 90,000 / - रु किमतीचे बैल गोरे 2 ) महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र . MH 29 T 3836 चा चालक मो . सद्दाम अ.रज्जाक वय 30 वर्षे रा . मंगरुळपिर जिल्हा वाशिम याने सदर वाहनामध्ये पांढर्या रंगाचे 4 व काळ्या रंगाचे 2 गोरे प्रत्येकी किं . 15,000 / - रु असा एकुण 90,000 / - रु किमतीचे बैल गोरे 3 ) अशोक लेलँन्ड बडा दोस्त वाहन क्र . MH 30 BD 4228 चा चालक शेख आमीन शेख जमील वय 27 वर्षे रा . भडशिवनी जिल्हा वाशिम याने सदर वाहनामध्ये पांढर्या रंगाचे 4 व लाल रंगाचे 3 गोरे प्रत्येकी किं . 15,000 / -रु एकुण कि .1,05,000 / -रु किमतीचे बैल गोरे 4 ) महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र . MH 37 J 1027 चा चालक अ . रियाज अ.नबी वय 40 वर्षे रा . काजळेश्वर ता . कारंजा जिल्हा वाशिम याने सदर वाहनामध्ये पांढर्या रंगाचे 4 व लाल रंगाचे 1 काळ्या रंगाचा 1 गोरे प्रत्येकी किं .15,000 / - रु एकुण कि .90,000 / -रु किमतीचे बैल गोरे 5 ) पांढ - या रंगाचा अशोक लेलँन्ड बडा दोस्त विना नंबर प्लेटचा या वाहनामध्ये पांढर्या रंगाचे 4 व लाल रंगाचे 2 काळ्या रंगाचा 1 गोरे प्रत्येकी किं . 15,000 / - रु एकुण कि . 1,05,000 / - रु किमतीचे बैल गोरे गोवंशाचे त्यांचे चारही पाय व तोंड सुती दोरीने घट्ट आवळुन बांधून , चारा पाणी न देता , कोबुंन दाटीवीटीने , अपुऱ्या जागेत ठेवुन , कोणतेही जनावरे खरेदी विक्रीची पावती न बाळगता , अवैद्यरित्या कत्तलीसाठी घेवुन जातांना एकुण 32 नग बैल गोरे गौवंश प्रत्येकी 15,000 / - रुपये प्रमाणे 4,80,000 / - रुपये 05 वाहने की . 12,90,000 / - रु चे असा एकुण कि . 17,70,000 / रुपयाचा मुददेमाल मिळुन आला सदर कार्यवाहीतील 32 बैल गोरे पुढील देखभाल व उपचारा करीता श्री पांजरापोळ संस्थान कारंजा गोरक्षण पलाना ता . कारंजा लाड येथे जमा करण्यात आले . व पो.स्टे . परत येवुन आरोपीतांविरुद्ध अप.क्र .51 / 2022 कलम 11 ( 1 ) ( घ ) ( ड ) ( च ) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रति . अधि . 1960 सहकलम 5 ( अ ) , 9 महाराष्ट प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 सहकलम 119 मपोका सहकलम 192 ( अ ) , मोवाका अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला . सदरची कारवाई बच्चन सिंह , पोलीस अधिक्षक वाशिम ,गोरख भामरे अप्पर पोलीस • अधिक्षक वाशिम ,जगदीश पांडे उपविभागीय पोलीस अधिकारी सा कारंजा यांचे मार्गदर्शनात पोनि अनिल ठाकरे , पोउपनि अर्जुन राठोड , नापोकाँ शरद सवई ब.नं. 279 , नापोकाँ राहुल जयसिंगकार ब.नं. 841 , पोकाँ आकाश खंडारे ब.नं .871 , पोकाँ अजय माकोडे ब.नं. 516 , मपोकाँ दिपाली पोहरे ब.नं. 1225 , ड्रानापोकाँ विजयसिंग राठोड ब.नं. 167 यांनी केली आहे .
No comments