उमरखेड(प्रतिनिधी) सम्राट अशोक धम्मपरिषद कारखेड फाटा ता. उमरखेड जि.यवतमाळ येथे रविवार दि.6मार्च रोजी पुष्पाई प्रतिष्ठानच्या वतीने...
उमरखेड(प्रतिनिधी)
सम्राट अशोक धम्मपरिषद कारखेड फाटा ता. उमरखेड जि.यवतमाळ येथे रविवार दि.6मार्च रोजी पुष्पाई प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास लेखनासाठी प्रसिध्द इतिहास संशोधक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ प्रेम हनवते यांना नांदेड येथील पुष्पाई प्रतिष्ठान चा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक(1996),गोपाळ बाबा वलंगकर-आंबेडकरी चळवळीचे आधारवड(2021) आणि येत्या 20 मार्च रोजी महाड येथे प्रकाशित होत असलेल्या महारांचा लष्करी इतिहास या संशोधात्मक संदर्भ ग्रंथ लिखानासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे पुष्पाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रो. डॉ.भास्कर दवणे (शास्त्रज्ञ-संचालक, रसायनशास्त्र संकुल स्वाराती विद्यापीठ नांदेड)यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.यावेळी विचारमंचावर स्वागताध्यक्ष माजी आमदार विजयराव खडसे, साहित्यिक प्रो. अनिल काळबांडे,दीपक भाई केदार, दंगलकार नितीन चंदनशिवे सांगली, आयोजक सुधाकर कांबळे खरुसकर, सुनील कवडे,ऍड. हरदडकर साहेब नांदेड ,विरेंद्र खंदारे, दत्तराजी काळे,भीमराव सोनूले आदी मान्यवर उपस्थित होते.संचलन सुधाकर कवडे आणि प्रा. गजानन दामोधर यांनी केले.
आपल्या स्मृतिशेष आई वडिलांच्या नावाने संस्था स्थापन करून समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा पायंडा डॉ भास्करराव दवणे सरांनी केला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ. प्रेम हनवते यांना 'गोपाळबाबा वलंगकर-आंबेडकरी चळवळीचेआधारवड'
(स्वयंदीप प्रकाशन पुणे )या संशोधन ग्रंथ लेखनासाठी 28 नोव्हेंबर 2021 रोजी पुरोगामी युवा ब्रिगेड व भाऊसाहेब माने प्रतिष्ठानचा 'सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण ' पुरस्काराने गौरविण्यात आले. तर महारांचा लष्करी इतिहास या ग्रंथ लेखनासाठी प्रकाशन होण्याअगोदरच त्यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर व्हावाआणि भव्य कार्यक्रमात तो सन्मान पूरक दिल्या जावा ही कौतुकास्पद बाब आहे.डॉ. प्रेम हनवते यांचा सन्मान करणारे भाऊसाहेब माने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजय माने हे कृषी शात्रज्ञ तर डॉ. भास्कर दवणे हे रसायन शात्रज्ञअसून दोघेही उमरखेड तालुक्यातील मतखंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चातारी ब्राह्मणगावचे सुपुत्र आहेत हा एक योगायोगच म्हणावा लागेल.
जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल डॉ प्रेम हनवते यांचे डॉ. अनिल काळबांडे,संतोष निथळे, भिमराव सोनूले, दत्तराजी काळे विरेंद्र खंदारे,प्रा. गजानन दामोधार,राहुल काळबांडे,उत्तम शिंगणकर,शाहरुख पठाण, फिरोज अन्सारी, आकाश माने, सुहास हिवरकर आदी मित्रांनी अभिनंदन केले आहे.
No comments