अकोला, दि 19: देशमुख समाज जागृती मंडळ अकोला यांचे वतीने शुक्रवारी ग्राम रिधोरा येथे राजाभाऊ बेलोकार यांच्या शेतात सहपरिवार इको फ...
अकोला, दि 19:
देशमुख समाज जागृती मंडळ अकोला यांचे वतीने शुक्रवारी ग्राम रिधोरा येथे राजाभाऊ बेलोकार यांच्या शेतात सहपरिवार इको फ्रेंडली होळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे इको फ्रेंडली होळी खेळत कोरडे रंग उधळण्यात आले. या होळीमध्ये पाण्याचा कुठलाही अपव्यय करण्यात आला नाही तसेच कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रक्षेपण करण्यात आले नाही. त्यानंतर स्नेहभोजन देण्यात आले. ज्यामध्ये पारंपारिक पद्धतीने बनलेले रान गोवर्यातील रोडगे आणि रुचकर शाकाहारी भोजन देण्यात आले. सर्वांनी या रुचकर शुद्ध शाकाहारी भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यानंतर सर्वांनी एकमेकांशी परिचय करून घेत देशमुख समाजासाठी जास्तीत जास्त सहकार्य देण्याचे सर्वानुमते ठरविले. या कार्यक्रमाकरिता समाजातील गणमान्य नागरिकांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत निरामय आरोग्य आणि प्रगतीसाठी कामना केली आणि इको फ्रेंडली होळीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशमुख समाज जागृती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तन-मन-धनाने परिश्रम घेतले.
No comments