Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

अभियांत्रिकी विद्यार्थ्याने घेतला गळफास

पब्लिक पोस्ट l पुसद   पुसद येथील देशमुखनगर मध्ये राहणाऱ्या सुजय संजय गुंबळे या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत असले...



पब्लिक पोस्ट l पुसद
 
पुसद येथील देशमुखनगर मध्ये राहणाऱ्या सुजय संजय गुंबळे या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण पुढे आलेले नाही.
येथील देशमुखनगर मध्ये राहणारा सुजय गुंबळे (२३) हा स्थानिक बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई (संगणक) अंतिम वर्षात शिकत होता. सुजयने शनिवारी दुपारी घरात आल्यानंतर आपल्या खोलीत जाऊन नायलॉन दोरीने छताला गळफास लावून आपली
जीवनयात्रा संपविली.
त्याच्या पश्चात वडील, आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संजय गुंबळे, आई पुसद येथील गुणवंतराव देशमुख बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुलभा पिंजरकर-गुंबळे, आजोबा सेवानिवृत्त प्राचार्य पांडुरंग गुंबळे, बहीण तेजस्वी प्रांगळे असा मोठा परिवार आहे. अत्यंत सुस्वभावी म्हणून ओळख असलेल्या सुजयने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे समजलेले नाही. त्याच्या आत्महत्येमुळे पुसद शहरावर शोककळा पसरली.

No comments