यवतमाळ शहरातील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्याविरुद्ध रविवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी सिव्हील ला...
यवतमाळ
शहरातील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्याविरुद्ध रविवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी सिव्हील लाईन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.कलम ३५४ सह पोस्को व आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी वसीम चौधरी यांना अटक केली आहे.अकोला येथील वसीम चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्या विरुद्ध रविवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार वसीम चौधरी यांनी अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग करून, त्यानंतर तिला खोलीवर बोलावून तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, अकोला शहरातील मध्यवर्ती भागात वसीम चौधरी यांचे कोचिंग क्लास आहे,त्यांच्या या कलास मध्ये पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत आहे.याचाच फायदा घेत सुरवातीला तिच्याशी जवळीक साधत तिच्या सोबत मोबाईल व्दारे अश्लील चॅटिंग करीत,तीला रूमवर बोलावून तिचा विनयभंग करून वसीम ने गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासला आहे.हा सर्व प्रकार घडल्यावर घाबलेल्या मुलीने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांसोबत थेट सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठून वसीम चौधरी विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३५४ (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करने आदी गुन्हे दाखल केले आहे. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी आरोपी वसीम चौधरीला अटक केली आहे. पुढील तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलिस करीत आहेत.
No comments