यवतमाळ दि. १८ जुलै -: शहरातील राधाकृष्ण नगर जांब रोड परिसरामध्ये इयत्ता सातवीतील विद्यार्थी नाल्यातील पाण्यात पडल्याने त्याचा ...
यवतमाळ दि. १८ जुलै -: शहरातील राधाकृष्ण नगर जांब रोड परिसरामध्ये इयत्ता सातवीतील विद्यार्थी नाल्यातील पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज दिनांक १८ जुलै २०२२ सकाळी ९ वाजताच्या सुमारास रोजी घडली.जय शंकर गायकवाड वय १२ वर्ष रा.राधाकृष्ण नगर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.तो लहान वडगाव मधील देवराव भाऊराव पाटील या शाळेमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता.आज तो सकाळी शाळेत गेला मात्र शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थी कमी असल्याच्या कारणाने तो घराकडे परतला.त्याचे पाय चिखलाने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरिता गेला असला पाय घसल्याने त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच संकल्प फाउंडेशनचे संकल्पसेवक मनोज तामगाडगे व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले व त्याला पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले.मात्र तो पर पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.काही दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचे सुद्धा सोमवारी दिवशीच दुर्दैवी निधन झाले होते.यामुळे त्याच्या पश्चात फक्त आई व आजी उरली असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या,नाल्यांना पूर आलेला आहे. करिता नागरिकांनी सतर्क राखून आपल्या पाल्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
No comments