Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

तीन दिवसात चार आत्महत्या, शेतकरी पुत्राने घेतले विष

यवतमाळ मारेगाव तालुक्यात आत्महत्या स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होतांनाचे गंभीर चित्र दिसत आहे . मागील तीन दिवसात झालेल्या चार आत्महत्येत पुन्हा...


यवतमाळ
मारेगाव तालुक्यात आत्महत्या स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होतांनाचे गंभीर चित्र दिसत आहे . मागील तीन दिवसात झालेल्या चार आत्महत्येत पुन्हा भर पडत आज मंगळवार दि .३० ऑगस्ट राजी शेतकरी पुत्राने विष ग्रहण करीत इहलोकाची यात्रा केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली . 
सचिन सुभाष बोडेकर ( २६ ) रा . रामेश्वर ता . मारेगाव असे विष प्राशन करून जीवनयात्रा संपविलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे . वडिलोपार्जित असलेल्या दोन एकर शेतीवर आई वडील सह बहीण भावंडांचा उदरनिर्वाह चालायचा . यंदाच्या अतिवृष्ठीने हातचे उभे पीक पाण्यात गेल्याने त्यांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला . अशातच हातचे पीक गेल्याने उमद्या मुलावर असलेल्या उत्पादनावर अपेक्षावर पाणी फेरल्या गेल्याने त्याच्यात अस्वस्थता होती . ही विवंचना जिव्हारी लावत शेतकरी पुत्राने आज विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली . त्याच्या पश्चात आई वडील व बहीण आहे . मागील तीन दिवसापासून सातत्याने होत असलेल्या आत्महत्येने तालुका गंभीर सावटात आहे . या प्रश्नावर शासन, प्रशासन मात्र मूग गिळून आहे .

No comments