Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

मेडिकल क्षेत्रामध्ये शोककळा, ड्रॉक्टर सुरेखा बरलोटा यांचे अपघाती निधन

यवतमाळ - यवतमाळ तथा विदर्भातील प्रसिद्ध असणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांच्या अपघाताने यवतमाळ शहरावरती ...



यवतमाळ - यवतमाळ तथा विदर्भातील प्रसिद्ध असणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांच्या अपघाताने यवतमाळ शहरावरती शोककळा पसरली असून त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैद्राबाद मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी प्रख्यात स्त्रि व प्रसुती रोगतज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा या दगावल्या असून अन्य तीनजन गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दोन वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटूंब यवतमाळकडे येत असतांना हि

दुर्घटना घडली.

डॉ. बरलोटा व त्यांचे मित्राचे कुटूंब यवतमाळला परत येत असतांना निर्मल ते हैद्राबाद मार्गावर टोल नाक्यानजीक निर्मलपासून 12 किमोमिटर अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक भ्रष्ट होऊन ते फुटले. त्यामुळे हा अपघात झाला. एमएच 29 बीपी 4200 क्रमांक असलेली हि गाडी अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर लोक धावले व त्यांनी जखमींना बाहेर काढून निर्मल यवतमाळ हैदराबाद रस्त्यावरील येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. पुजा पियुष बरलोटा वय 16 तसेच अतिथी वय 18 आणि मिनल वय 40 असे तिघेजन निर्मल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकी इतरांना किरकोळ जखमा असल्याचे समजते. हि वार्ता यवतमाळात येताच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. बरलोटा यांचे मित्र निर्मलकडे रवाना झालेत. हैद्राबाद येथील
यांचे मित्र निर्मलकडे रवाना झालेत. हैद्राबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा हे पार्थिक यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.

दोघांचे शेवटचे संभाषण
----------------------------
आरोग्य क्षेत्रामध्ये आपण यापुढेही असेच काम करत राहायचे आहे विशेष म्हणजे आता यवतमाळ साठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून रुग्णांना त्याची सेवा यवतमाळतच उपलब्ध करून द्यायची अशा प्रकारचे शेवटचे संभाषण आपल्या पत्नी सोबत डॉ. बरलोटा यांनी केले विशेष म्हणजे त्यांनी या संवादातून यवतमाळच्या सेवेचा उल्लेख केला होता आणि तो शेवटचा संदेश ठरला

No comments