यवतमाळ (प्रतिनिधी) शिक्षण विकास मंडळ द्वारा संचालित पीसीएल हायस्कूल दाभा, शिक्षण विकास कनिष्ठ महाविद्यालय दाभा तसेच व्यावसायिक अ...
यवतमाळ
(प्रतिनिधी)
शिक्षण विकास मंडळ द्वारा संचालित पीसीएल हायस्कूल दाभा, शिक्षण विकास कनिष्ठ महाविद्यालय दाभा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वतीने 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्य दाभा या गावातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. वसंत परोपटे प्रमुख अतिथी महादेवराव घावडे, मालती जवळकर, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र ठाकूर पर्यवेक्षक चंद्रकांत हुड तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रकाश संगीतराव व गावच्या सरपंच वंदना दोडंगे, पोलीस पाटील शारदा दोडंगे व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा धांदे यांची उपस्थिती होती.यावेळी कर्तबगार महिलांचा पीसीएल मध्ये सत्कार करण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वर्ग आठच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीतसंच तथा दीपक वाघ यांनी सावित्री वंदना सादर केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र ठाकूर यांनी केले. यावेळी गावातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष व दाभा येथील सरपंच वंदना दोडंगे, पोलीस पाटील शारदा दोडंगे, मालती जवळकर मंगला पंचबुद्धे, रेखा लोखंडे, हर्षाली मेहेत्रे, पुष्पा धांदे, माधुरी बाहूटे, सरिता गावंडे, प्रा. श्रद्धा धवणे, सुनीता भगत, पपीता सिडाम, आरती महल्ले, प्रतिभा लोखंडे, सुनंदा मुलांडे, नीलिमा गांजरे, सविता दहीकर, सुरेखा तिखे, यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन विशाखा तलवारे यांनी केले. आभार प्रदर्शन स्वाती खेरडे यांनी मानले. यावेळी संगीत खुर्ची स्पर्धा व उखाणे स्पर्धा सुद्धा संपन्न झाली. शालेय स्तरावर वेशभूषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments