अमरावतीत(प्रतिनिधी) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. अशातच भाजपची उमेदवारी डॉ. रणजीत पाटील यांना जाहीर झाली आहे....
अमरावतीत(प्रतिनिधी)
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. अशातच भाजपची उमेदवारी डॉ. रणजीत पाटील यांना जाहीर झाली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नसतानाच पदवीधर निवडणुकीचे उमेदवार तथा काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांच्या समर्थकांनी नाना पटोले यांच्या आजच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. स्थानिक पंचवटी चौकाच्या उड्डाण पुलावर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या तिघांचे फोटो व नाव आहेत. त्यामध्ये अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे व अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमटे यांचा फोटो आहे. तर खाली शाम प्रजापती यांचा फोटो आहे. ढोणे यांच्या फोटोसमोर पदवीधरांसाठी विशेष कोणतेही काम नाही, प्रस्थापित घराणेशाहीचा मोठा वारसा. तर चिमोटे यांच्या फोटो समोर केवळ प्रस्थापित नेत्यांचे पाठबळ त्याशिवाय ग्राउंडवर काडी मात्र हे काम नाही असं आकर्षक कॅप्शन त्याला देण्यात आले आहे. तर खाली शाम प्रजापती.. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवणारा जिगरबाज माणूस असे धडाकेबाज कॅप्शन देण्यात आले आहे. या बॅनरमधून काँग्रेस नेमका कोणाला न्याय देणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नाना पटोले हे आज अमरावती दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त शाम प्रजापती यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेली ही बॅनरबाजी अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे काँग्रेस पदवीधरच्या निवडणुकीत कोणाला संधी देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
No comments