रावेरी येथील शेतकरी यांना ३७५०० रुपयांचा धनादेश वि.आ.उईके यांच्या हस्ते प्रदान पब्लिक पोस्ट मनोहर बोभाटे राळेगाव: राळेग...
पब्लिक पोस्ट
मनोहर बोभाटे
राळेगाव:
राळेगाव तालुक्यातील हाकेच्याअंतरावर असलेल्या रावेरी येथील शेतकरी भाऊराव केशवरावजी पिंपरे यांच्या शेतात दिनांक 30 /4 /2023 रोजी वीज पडून गोठ्यात बांधून असलेल्या गाईचा मृत्यू झाला व तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या गाईला देखील त्याची इजा पोहचली होती, त्याची दखल घेत आज रोजी प्रशासन यांच्या वतीने विद्यमान आमदार प्रा.अशोक उईके यांनी आज असलेल्या तालुक्यातील अतिवृष्टीच्या दौऱ्या संदर्भात रावेरी येथील शेतकरी भाऊराव केशवराव पिंपरे याना आज रोजी 37500 रुपयांचा झालेल्या नुकसानीचा धनादेश सुपृत करण्यात आला,
प्रशासन शेताच्या बांधावर हजर होताना आज रोजी त्यांना सदतीस हजार पाचशे रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला त्यावेळी प्रशासनातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला त्यावेळी विद्यमान आमदार अशोक उईके, तहसीलदार भूईटे, रावेरी येथील तलाठी गेडाम , ग्रामसेवक कुरतकर व भाजपा पदाधिकारी तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments