Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

पावसामुळे खड्ड्यात पडून पुरामुळे महिलेचा मृत्यू

यवतमाळची घटना  यवतमाळ – विजय मालखेड़े आज सकाळी ७ वाजता पासून यवतमाळ शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र जलमय वाता...


यवतमाळची घटना 

यवतमाळ –
विजय मालखेड़े
आज सकाळी ७ वाजता पासून यवतमाळ शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र जलमय वातावरण झाले असतांना शहरातील लहान-मोठ्या नाल्यांना पुर आला. त्यामध्येच यवतमाळ येथील वाघापूर रोड बांगर नगर परिसरातील एस.के. पेट्रोलपंप समोर ड्रॅनेज सिस्टिमच्या खड्ड्यामध्ये पडून नाल्याला आलेल्या पुरामुळे एका ५५ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू आज नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे झाला.
याबाबत सविस्तर असे की सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे वाघापूर रोडवरील एस.के. पेट्रोलपंप समोर असलेल्या छोट्याशा नाल्यावर मोठ्या प्रमाणावर जलाशय निर्माण झाला. पेट्रोलपंपाच्या समोरच असलेल्या ड्रॅनेजच्या खड्ड्यामध्ये पडून बेबी घोडमारे या महिलेचा मृत्यू झाला. सकाळी १०.३० वाजतापासून नगर पालिका प्रशासनाने या महिलेला वाचविण्यासाठी जेसीबी व अग्नीशमन दलाच्या सहकार्याने वाचविण्याचे प्रयत्न केले. नगर पालिका प्रशासनाच्या या प्रयत्नाला अपयश आले व या महिलेचा मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे या परिसरातील काही धनदांडग्यांनी नाल्यावर अतिक्रमण करुन आपले घरदार थाटले आहेत.
याकरीता न.प. चे तत्कालीन अभियंता हे जबाबदार असल्याचे नागरीकांमध्ये बोलल्या जात आहे. पावसाळ्यापुर्वी शहर काँग्रेस कमेटिने शहरातील स्वच्छतेसंदर्भात न.प. प्रशासन व जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन सुध्दा जिल्हा प्रशासन नगर पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या बाबींकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आज सततधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे बेबी घोडमारे यांना आपले जिव गमवावे लागले. पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचार्यांनी एका बालकाचे प्राण वाचविले दरम्यान या महिलेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतांना आलेल्या पुरामुळे (जलाशय) महिलेचा हात सुटून कर्मचा-यांच्या हातात बांगड्या आल्या व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे बेबी घोडमारे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तसेच नगर वाचनालय बिल्डींग समोर जुन्या अंजुमन शाळेजवळील पटेल इलेक्ट्रीकल जवळील खड्डा भविष्यातील मृत्यचे निमंत्रण यवतमाळकरांना देत असून याबाबत नगर पालिकेने जागृत राहून पुढील मृत्यूचे तांडव थांबवावे अशी मागणी यवतमाळकर नागरीकांच्या वतीने होत आहे. आज शहरातील रोहिले बाबा सोसायटी पिंपळगाव, तलाव फैल परिसरात सुध्दा नाल्याच्या पुरामुळे लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.

No comments