अकोला संजय कमल अशोक देशमुख हात उसनवारी म्हणून घेतलेले पन्नास हजार रुपये न देणे एका आरोपीला चांगलेच महागात पडले आहे. पैसे परत दे...
अकोला
संजय कमल अशोक देशमुख
हात उसनवारी म्हणून घेतलेले पन्नास हजार रुपये न देणे एका आरोपीला चांगलेच महागात पडले आहे. पैसे परत देतो म्हणून दिलेला धनादेश अनादर झाला, या धनादेश अनादर प्रकरणी अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी करार देत ७५ हजाराचा भरणा करण्याची शिक्षा ठोठावली आहे तसेच एक महिन्याचा साधा तुरुंगवासाची शिक्षेत तरतूद केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , राम पुरी वय ५०, राहणार जुना आरटीओ कार्यालय, मुर्तीजापुर रोड अकोला, याने ओळखीचा गैर फायदा घेत महेश मोतीलाल बजाज यांच्याकडून पन्नास हजार रुपये उसनवारी घेतले होते. सदर पैसे एका महिन्यात परत देतो म्हणून त्यापोटी धनादेश दिला होता. त्यानंतर सदर रक्कम ठराविक वेळेत न आल्याने धनादेश वटविण्यासाठी टाकला असता तो अनादर झाला. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात विधीज्ञ सुमित महेश बजाज व विधीज्ञ वर्षा सदर यांनी खटला दाखल करून न्यायालयात दाद मागितली. सदर प्रकरणी सत्यता पडताळून प्रथम श्रेणी न्यायाधीश एन डी जाधव यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली आहे.
No comments