Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

संभाजी भिडे यांच्या विरोधात सर्व संघटना आक्रमक.

विविध सामाजिक राजकीय संघटनांना केले पोलिसांनी स्थानबद्ध. यवतमाळ    यवतमाळ येथे संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम श्...



विविध सामाजिक राजकीय संघटनांना केले पोलिसांनी स्थानबद्ध.

यवतमाळ 
 यवतमाळ येथे संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यवतमाळ विभागाद्वारे बलवंत मंगल कार्यालय येथे आर्णी रोड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता.
अमरावती येथील कार्यक्रमांमध्ये महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले त्यामुळे यवतमाळ मधील त्यांच्या या कार्यक्रमाला आबेडकरी संघटनांनी व राजकीय पक्षांनी विरोध केला. संभाजी भिडे यांना अटकेची मागणी यावेळी करण्यात आली.अनेक सामाजिक संघटनेने व राजकीय पक्षाने या कार्यक्रमाचा विरोध करून त्यांचे पोस्टर फाडण्यात आले. यावेळी आंबेडकरी जन आक्रोश मोर्चाच्या महिला प्रमोदिनी रामटेके, ॲड.जयसिंग चव्हाण, संगीता पवार, विजय धुळे आशिष खंरतडे, वंचित बहुजन युवा आघाडी चे आकाश वाणी,कुंदन नगराळे,प्रफुल शभरकर, महिला सचिव भारती सावते, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी,जावेद अन्सारी, चंदू चौधरी,उषा दिवटे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे व इतर सामाजिक पक्षाने जाहीर त्यांचा निषेध केला रस्त्यावरती उतरून आंदोलन कर्त्यानी नारे लावून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकाना पोलीस स्टेशन अवधूत वाडी येथे स्थानबद्ध करण्यात आले.

No comments