Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

कोसदणी पोलीस मदत केंद्राच्या वाहनासह पोलिसालाच चिरडलं

  पब्लिक पोस्ट   रजतकुमार खाडे महागाव : नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि...

 


पब्लिक पोस्ट 
 रजतकुमार खाडे
महागाव : नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा  मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कोसदनी घाटामध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक पोलीस कर्मचारी व आयशरचा चालक जागीच ठार झाले आहेत. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.
 या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.
नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोसदणी घाटात हा भीषण अपघात शनिवारी (ता.२९) मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. महामार्ग पोलीस यावेळी एक ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यावेळी तपासणीसाठी रस्त्यावर उभ्या असलेला पोलीस कर्मचारी हा तपासणीसाठी थांबलेला ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये चिरडला गेला. या अपघातत संजय नेटके या पोलीस कर्मचाऱ्याचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना यवतमाळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

No comments