मनोहर बोभाटे पब्लिक पोस्ट देशाला हादरवनाऱ्या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या ...
मनोहर बोभाटे
पब्लिक पोस्ट
देशाला हादरवनाऱ्या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने २७ जुलै २०२३ रोज गुरुवारला धडक मोर्चा काढण्यात आला होता. मणिपूर मध्ये दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत दिंड काढून त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक पाशी मदत करणाऱ्या नरदमांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत केंद्र सरकारचा व मणिपूर सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच यावेळी मनिपुर मध्ये शांतता हवी व तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा किरीट सोमय्यावर कार्यवाही करावी शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडावे अशी मागणी करत राळेगाव शहरातील प्रमुख चौकात याप्रसंगी निषेधपर भाषणे झाली.आदिवासी महिलांचे रक्षण करा महिलांचा सन्मान करा महिलांचा सन्मान न करणाऱ्या शासनाचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या स्थानिक क्रांती चौकात व प्रशासकीय इमारती समोर निदर्शने देण्यात आली याप्रसंगी माजी मंत्री प्रा वसंत पुरके काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वंदना आवारी कॉटन फेडरेशनचे संचालक सुरेश चिंचोळकर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोंन कर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी तालुकामहिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुष्पा कोपरकर शहराध्यक्ष जोशना राऊत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले वसंत जिनिंगचेअध्यक्ष नंदकुमार गांधी कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू पोटे बाभूळगाव कळंब येथील विविध संस्थांचे संचालक राळेगाव शहरातील विविध संस्थांची संचालक नगरसेवक सोसायटी संचालक ग्राम पंचायत सदस्य शेतकरी महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते निषेध म्हणून मणिपूर घटनेतील दोषीवर कार्यवाही करावी अशा प्रकारची निवेदन उपविभागीय अधिकारी मेघना कवाली यांना दिले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निषेध मोर्चात राळेगाव विधानसभा मतदार संघातील हजारोच्या संख्येने पुरुष महिला उपस्थित होत्या.
No comments