* पब्लिक पोस्ट तालुका प्रतिनिधी घाटंजी :-यवतमाळ जिल्हयातील घाटंजी तालुक्यात दिनांक २१/०७/२०२३ रोजी पासून सततधार सुरू असलेल्या न...
*
पब्लिक पोस्ट
तालुका प्रतिनिधी
घाटंजी :-यवतमाळ जिल्हयातील घाटंजी तालुक्यात दिनांक २१/०७/२०२३ रोजी पासून सततधार सुरू असलेल्या नैसर्गीक पावसामुळे नदी, नाल्यांना पुर येवून अतोनात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानाची शासन स्थरावर अत्यंत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी याबाबतचे निवेदन घाटंजी येथील भारत राष्ट्र समिती ( BRS ) पक्षाचे पदाधिकारी यांनी तहसीलदार घाटंजी यांना दिले.
यवतमाळ जिल्हा हा पांढया सोन्याचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. यवतमाळ जिल्हयातील घाटंजी तालुक्यात बहुल आदिवासी व शेतकरी बांधव असून शेतीचे उत्पन्नावर उदरनिर्वाह करणे म्हणजेच शेती कसून कुंटूंबाचा उदरनिर्वाह करणे हा प्रमुख व्यवसाय आहे. म्हणजेच सर्व समाज शेतीवर अवलंबुन आहे. पावसाळी हंगामाला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांचे शेतात पेरणी, टोबणी झालेली आहे. शेतकरी बांधव हा पुर्णत: निसर्गावर अवलंबुन असतो. परंतू याच निसर्गाने महाप्रलय रूप धारण करून यवतमाळ जिल्हयातील घाटंजी तालुक्यात दिनांक २१/०७/२०२३ रोजी पासून आगमण केलेले आहे. त्यामुळे रात्रदिवस धो-धो पडणाऱ्या पावसामुळे नदी, नाल्यांना मोठया प्रमाणात पुर येवून सुपिक जमीन पिकासह खरडून गेलेली आहे. दरवर्षीचे नापिकी व निसर्गाचे अवहेलनामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. दरवर्षी दुबार पेरणीचे सावट सुरू आहे, आजरोजी शेतकरी संकटात सापडलेला आहे.
तालुक्यात हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली असून शेतकऱ्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे या नैसर्गीक आपत्तीमुळे आज रोजी पुन्हा तो मरणाचे दारात उभा आहे.
त्यामुळे तहसीलदाराना निवेदनाद्वारे *भारत राष्ट्र समितीकडून विनंती करण्यात आली कि सदर प्रकरणाची आपले कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांचे मार्फत मोका पाहणी* चौकशी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकन्यांना एकरी रूपये ५०,०००/- पन्नास हजार रूपये व घराची पडझड नुकसान रूपये १,००,०००/- एक लाख रूपये अनुदान मंजूर करण्यात यावे. करीता निवेदन देण्यात आले निवेदन देता वेळेस रमेशभाऊ धुर्वे माजी सभापती पं. समिती घाटंजी, बंडूभाऊ तोडसाम,सुरज प्र जाधव,सुधाकर अक्कलवार,राकेश आपतवार,
अमोल गेडाम,संतोष गिरी,आदी भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
No comments