तालुका प्रतिनिधी दिग्रस पांढऱ्या शिधापत्रिका सोडल्या तर इतर सर्वच शिधापत्रिका धारकांना मोफत अन्नधान्य सुरू असल्याने राशनच्या धा...
तालुका प्रतिनिधी
दिग्रस
पांढऱ्या शिधापत्रिका सोडल्या तर इतर सर्वच शिधापत्रिका धारकांना मोफत अन्नधान्य सुरू असल्याने राशनच्या धान्याचा काळाबाजार हा मोठ्या प्रमाणात फोफावत असल्यामुळे या अन्नधान्याची कमी किमतीत खरेदी करून याची साठेबाजी सुद्धा मोठ्या करण्याचा गोरख धंदा सुरू आहे हीच बाब कळ्या बाजारातील साठेबाजांच्या कलगीतुऱ्यातून मोठ्या प्रमाणात राशनच्या धान्याचे साठेबाजी करण्यात आल्याची टीप दिग्रस येथील महसूल विभागामध्ये दिल्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी राशनच्या धान्याचे साठेबाजी करण्यात करण्यात आलेल्या ठिकाणी महसूलच्या अधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत रात्री उशिरापर्यंत कारवाईचा खटाटोप महसूल प्रशासनाकडून करण्यात आला.
मात्र राशन धान्य साठेबाज त्याहीपेक्षा चलाखीने शेकडो टनाचा राशन धान्याचा साठा त्या ठिकाणी आढळून आला असता ही क***** बाजारातील धान्य कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची साठे लोटे करून अल्प प्रमाणात कसा दाखवता येईल याचा खटाटोप तसेच राशनच्या शासकीय कट्ट्यामध्ये नसल्याचा आधार घेत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे एका सामाजिक संघटनेने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणल्याचा कागावा तेथे करण्यात आल्याची कुन कुन होत आहे मात्र महसूल विभाग राशनच्या साठेबाजी वर कोणती कार्यवाही करणार की साठे बाजा सोबत आर्थिक हितसंबंध साधून कारवाईला वळण वेगळं देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
29 जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत महसूल विभाग कारवाईत व्यस्त असल्यामुळे या संबंधित बाबीची चौकशी करण्याकरिता दिग्रस तहसीलचे चौकशी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून उशिरापर्यंत चाललेल्या चौकशीवर काय कार्यवाही करण्यात आली या संबंधित बाबीवर भ्रमणध्वनीवरून चौकशी केली असता चौकशी अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी नॉट रिजबल आल्यामुळे राशनच्या साठेबाजीवर कारवाई गुलदस्त्यात आहे
No comments