Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ऑल इंडिया संपादक संघाशी संवाद

* पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव केंद्र शासन पाठीशी राहणार!  *पुणे दि.31 जुलै:* वृत्तपत्र क्षेत्र हा लोकशाहीचा चौथा स्त...

*

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव केंद्र शासन पाठीशी राहणार!
 *पुणे दि.31 जुलै:*
वृत्तपत्र क्षेत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या क्षेत्राची ओळख स्वतंत्र आहे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे याबाबत त्याने मांडत असतात त्यामुळे या माध्यमांच्याही काही समस्या असतात त्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सरकार विशेषता पत्रकारांच्या समस्या सोडण्यासाठी सदैव तत्पर राहील आणि त्याचे निराकरण करेल असे प्रतिपादन ऑल इंडिया संपादक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांच्याशी संवाद करताना केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी मत प्रकट केले.
देशामध्ये ऑल इंडिया संपादक संघाचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत असून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी समस्त बहुजन विचारवादी पत्रकारांनी एकत्रित उभे केलेले हे संघटन पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आदर्श संघटन बनणार असून त्याबाबत त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात.
 महाराष्ट्र राज्यातील ऑल इंडिया संपादक संघाच्या कामाची दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी दि.31 जुलै रोजी संघटनेचे कौतुक करत शुभेच्छा संदेश पत्र पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांना पाठवले आहे.
           ऑल इंडिया संपादक संघ ही संघटना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित आहेत भारत देशातील आंबेडकरी आणि बहुजन चळवळीत कार्यरत असलेल्या वृत्तपत्रांची देश पातळीवरील ऑल इंडिया संपादक संघ ही राष्ट्रीय संघटना आहे. संघटना सुरु करणे सोपे असले तरी,तिच्या कामात सातत्य ठेवणे व ते विस्तारत नेणे कठिण असते महाराष्ट्र राज्यात संपादक तसेच पत्रकार यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला.त्यांचे फलित म्हणून  संघटनेवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे भविष्यातील सर्वच उपक्रमासाठी संघटनेला व महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा असे शुभेच्छा संदेश पत्रात कौतुक केले आहे.

No comments