Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

अकोला  जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी दाखल होत्या.दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पायबंद घालण्यासाठी स्थानिक ग...




अकोला 
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी दाखल होत्या.दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पायबंद घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आणि २५ लाख रुपये किमतीच्या ४१ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मेहराजशाह मुसाशाह (वय ३२ वर्ष) रा. वरणगांव ता. भुसावळ, जि. जळगाव)  त्रिलोक सोपीनाथ खंडेराव, (वय २२ वर्ष) रा. वार्ड नंबर २ भिमनगर, बुलढाणा अशी चोरट्यांची नावे आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
        या संदर्भात रामदास पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व पोलिसांनी  तांत्रीक व गोपानिय माहीतीच्या आधारे तपास करून मुक्ताई नगर जि.जळगाव परीसरातुन संशयावरून मेहराजशाह मुसाशाह याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता अकोला शहर, बाळापुर, खामगाव, मलकापुर शहर, बुलढाणा शहर, अंमळनेर जि. जळगाव येथून एकूण १३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.त्याच्या जवळून १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सपोनि कैलास भगत व पथकातील पोलिसांनी बाळापूर पोलीस ठाण्यात 
दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता गोपनिय बातमीदाराकडुन 
मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून त्रिलोक सोपीनाथ खंडेराव याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने पातुर, बाळापुर, चान्नी परीसरातुन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.त्याच्या जवळून  २८ दुचाकी जप्त केल्या आहेत. पुढील तपास कामी गुन्ह्यातील १ आरोपी रामदास पोलिसांच्या तर दुसऱ्या आरोपीला बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


यांनी केली कारवाई 
सदर कारवाई पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके ,सपोनि कैलास भगत, 
पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, पोउपनि गोपाल जाधव, पोलीस अंबमलदार फिरोज खान, दशरथ बोरकर, स्वप्निल चौधरी, खुशाल नेमाडे, धिरज वानखडे, गोकुळ चव्हाण लिलाधर खंडारे, अन्सार शेख, स्वप्निल खेडकर, उमेश पराये, आकाश मानकर, अभिषेक पाठक, दत्ता ढोरे, विशाल मोरे, अविनाश पाचपोर, अब्दुल माजिद, एजाज अहेमद, रवि खंडारे, अमीर, अमोल दिपके, संतोष दाभाडे, महेद्र मलीये चालक ना. पो. कॉ. प्रशांत कमलाकर, प्रकाश लोखंडे यांनी केली.

चौकट 
२५ लाख रुपये किमतीच्या ४१ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून  पोलीस स्टेशन रामदासपेठ, सिव्हील लाईन, चान्नी, बाळापुर, तसेच बुलढाणा, जळगांव जिल्हयातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, गाडीच्या चेचीस नबंर वरून खऱ्या  मालकाचे नाव निष्पन्न करून दाखल असलेल्या गुन्हयांची माहीती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

No comments