* *पब्लिक पोस्ट प्रतिनिधी दारव्हा* शहरालगत दि.०१ ऑगस्ट रोजी रात्री ८च्या सुमारास एका तरुणाची हत्या करण्यात आली होती.या हत्येची व...
*
*पब्लिक पोस्ट प्रतिनिधी
दारव्हा*
शहरालगत दि.०१ ऑगस्ट रोजी रात्री ८च्या सुमारास एका तरुणाची हत्या करण्यात आली होती.या हत्येची वार्ता तालुक्यात पसरताच एकच खळबळ उडाली होती.या हत्या प्रकरणाची दारव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली असता,प्रेयीसीच्या प्रियकराने सुपारी देऊन हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.यातील २आरोपींना अटक करून २४ तासाच्या आत आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि १ ऑगस्ट रोजी दारव्हा पोलिसांना खबर मिळाली की,शहरालगत कुपटा रोडवरील जिनींग जवळ नालीत एक तरुण जखमी अवस्थेत पडून आहे. त्याचे डोक्याला मार लागलेला दिसत असुन रक्त निघत आहे.यावरून दारव्हा पोलीस स्टेशन चे कर्तव्यावर असलेले पोकॉ किषोर जाधव, चापो कॉ सलिम पठाण वाहणाने त्या ठिकाणी गेले.त्याठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत चेहऱ्याला व डोक्याला मार लागलेला मिळून आला. प्रथमदर्शनी सदर ईसमास कोणीतरी अज्ञात इसमाने जिवाने मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याचे दिसून आले. सदर घटनास्थळावर पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी पोलीस स्टाफ सह पोहचून जखमीस उपचार करीता उपजिल्हा रूग्णालय दारव्हा येथे पाठविले.पोलिसांनी पो.हवा. सुनिल राठोड यांचे लेखी तक्रारीवरून अप ३०७ भादंवि चा दाखल केला.सदर जखमी इसम तालुक्यातील मांगकिन्ही येथील उमेश सदाशिव चव्हाण वय २७ वर्ष असल्याचे निष्पन्न झाले होते. सदर इसमाचा दि.०२ ऑगस्ट रोजी स. ८ वा उपचारादम्यान यवतमाळ रुग्णालयात मृत्यू झाल्याने
कलम ३०२ भादंवि चा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोउपनि धनंजय रत्नपारखी, पोहवा सुनिल राठोड, पोहवा रवी मोर्लेवार, पोहवा सुशिल चेके, नापोकॉ सुरेश राठोड,पोकॉ अमोल सोनुने असे तपास पथक तयार करून मांगकिन्ही येथे तपासासाठी पाठविण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता जखमी इसम याचे पत्नीचे गावातीलच शंकर प्रेमसिंग चव्हाण वय २२ वर्ष याचे सोबत प्रेमसंबंध असून त्यानेच उमेश सदाशिव चव्हाण यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
संशयित इसम शंकर प्रेमसिंग चव्हाण वय २२ वर्ष रा. मांगकिन्ही यास ताब्यात घेण्यात येवून त्याचेकडे तपास केला असता त्याने गुन्हयाची कबूली दिली आहे.मृतक हयाचे पत्नीसोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते. मृतक हा त्याचे पत्नीस मारहाण करायचा असे त्याला समजले. यावरून मृतक उमेश सदाशिव चव्हाण याचा खुन करण्यासाठी नेर तालुक्यातील दोन इसम नामे रामा शंकर जाधव वय २९ वर्ष रा. सिंदखेड, व अन्य एक यांना ३०,००० रू मध्ये सुपारी देऊन हत्याकांड घडविण्याची कबुली दिली आहे.पोलीसांची दोन पथके तयार करून ईतर आरोपी याचा शोध घेतला असता आरोपी रामा शंकर जाधव यास ग्सिंदखेड येथून ताब्यात घेतले. तर अन्य एक आरोपी हा घटना तारखेच्या रात्रीपासून घरी नसल्याचे त्याचे घरच्यांनी सांगीतले. ताब्यात घेतलेले आरोपी शंकर प्रेमसिंग चव्हाण आणी रामा शंकर जाधव यांना दि.०२ ऑगस्ट ला अटक करण्यात आली असून उर्वरीत आरोपी याचा शोध घेणे सुरू आहे. नमूद आरोपी यांना आज रोजी वि.न्यायालयात हजर केले असता ७ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.
सदरचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला.
No comments