छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ...
छत्रपती संभाजी नगर
प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे नियंत्रण पाहायला मिळण्याची दाट शक्यता वरती दिली जात आहे. संस्थेच्या सदस्यपदी भाजपाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार श्रीकांत जोशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू निवृत्त सनदी अधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील पायाभूत सुविधा प्रकल्पाचे वाररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी अतिशय कष्टाने स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आता हळूहळू भाजप आणि आरएसएसचा दबदबा निर्माण होण्याची परिस्थिती दिसत आहे.
बौद्ध धम्म चळवळीमध्ये आपले खूप मोठे योगदान असल्याचे सांगून महाउपासक अशी बिदुरुदावली मिरवणारे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 ऑगस्ट रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या केंद्रीय सभेत हा निर्णय घेण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी 27 जुलै रोजी एज्युकेशन सोसायटीच्या सभेमध्ये जोशी आणि मोपलवार तसेच विश्वनाथ शेगावकर सी आर सांगलीकर आणि निवृत्त सनदी अधिकारी आणि औरंगाबादचे माजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर या सहा जणांचे नावावर चर्चा करण्यात आली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती या एज्युकेशन सोसायटीचा उद्देश शिक्षण देणे नाही तर बौद्धिक नैतिकविकास आणि सामाजिक लोकशाहीला चालना देऊन समाजामध्ये आधुनिक पिढी घडवणे हा होता. आधुनिक भारताची निर्मिती करून भारत बौद्धमय करणे हा उद्येश सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवून ही आधुनिक भारताची ही गरज आहे आणि भारताच्या सर्व हितचिंतकांनी याचा प्रसार केला पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार समाजासमोर ठेवले बाबासाहेबांच्या पश्चात पीपल्स एज्युकेशन सोसायटीची धुरा सांभाळणाऱ्यांनी बाबासाहेबांचा दृष्टिकोन जोपासणे अनिवार्य होते परंतु तसे झाले नाही. गेल्या काही दिवसापासून या संस्थेमध्ये घुसखोरी सुरू झाल्याने आता समाजाचे काय होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे या संस्थेच्या अंतर्गत चालविणाऱ्या अनेक महाविद्यालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गुणवत्तेकडे प्रचंड दुर्लक्ष झालेले असून त्याकडे कोणी लक्ष देईल का?
एकेकाळी या महाविद्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लागायच्या आज मात्र विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे त्यात व्यवस्थापनाच्या या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाची भोजपुरी झाल्याने आता ही परिवर्तनवादी केंद्र बनेल की या ठिकाणी प्राचीन परंपरागत वैदिक शिक्षण पद्धतीचे अंकगणितशिकविले जाईल हे मात्र न समजणारे कोडे आहे.
शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नामधील भारताचा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी या संस्कार केंद्राकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवर विचारवंताची समोर आलेली आहे.
No comments