Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

केंद्र पुरस्कृत वन स्टाफ सेंटरवर डॉ. लीलाताई भेले

* यवतमाळ  प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील संकटग्रस्त पीडित महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळणे करिता व बाल विकास विभाग अंतर्गत कें...

*

यवतमाळ 
प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील संकटग्रस्त पीडित महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळणे करिता व बाल विकास विभाग अंतर्गत केंद्र पुरस्कृत वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या योजनेची जिल्हास्तरावर व्यवस्थापन समिती निर्माण करण्यात आली असून नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला भेले यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आयुक्त नगर परिषद, जिल्हा परिषद जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तथा तंत्रनिकेतन जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग पांढरकवडा, सहाय्यक आयुक्त दिव्यांग कल्याण यवतमाळ कथा नामनिर्देशित सदस्य श्रीमती डॉ. आशा देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा सचिव म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची निवड करण्यात आलेली आहे सदर निवडीचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष व्यवस्थापकीय समिती वन टॉप सेंटर यवतमाळ यांनी दिले आहे. या निवडीबद्दल सामाजिक परिवर्तनवादी संघटना तसेच सर्व समाज घटकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.

No comments