यवतमाळ : बेवारस मनोरुग्णांना नवजीवन देणारे नंददीप शहरी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे अतिशय मानवतेचे कार्य यापुढेही वाढवत राहू,ह...
यवतमाळ :
बेवारस मनोरुग्णांना नवजीवन देणारे नंददीप शहरी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे अतिशय मानवतेचे कार्य यापुढेही वाढवत राहू,हा विश्वास नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिला.त्यांच्या हस्ते येथील निवारा केंद्रात स्वतंत्र वैद्यकीय कक्षाचे उदघाटन पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
मनोरुग्णांच्या हक्काचे पहिलेवहिले आधार केंद्र म्हणून
नंददीप शहरी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राने जिल्ह्यात ख्याती मिळवली.नगर पालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत नंददीप शहरी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राची वाटचाल सुरु आहे.
याच केंद्रात आज स्वतंत्र अशा वैद्यकीय कक्षाची भर पडली आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अनिल पटेल,डॉ.विजय कावलकर यांच्यासह सुरेश राठी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.आशिया म्हणाले की,नंददीप फाउंडेशनचे मनोरुग्णांप्रति असणारे हे कार्य अतिशय मानवतेचे आहे.तेव्हा या मानवीय कार्याला यापुढे आपण नेटाने पुढे नेऊ,असा विश्वास त्यांनी दिला सोबतच या कार्यास माझे नेहमी सहकार्य असल्याचे त्यांनी आश्वस्तही केले.त्यानंतर मुख्याधिकारी तथा प्रशासक डोल्हारकर यांनी संदीप शिंदे यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले.ते म्हणाले की, संदीप आणि मी एकाच गावातील असून त्याच्या सामाजिक वृत्तीचे दर्शन मला यापूर्वीही घडले आहे.या केंद्रातून देशभरातील मनोरुग्णांना नवे जीवन मिळाले असून या कार्यात नगर पालिका प्रशासन त्यांच्या दिमतीला नेहमी तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले.या सेवाकार्यात पैश्यापेक्षा तुमच्यातल्या संवेदना महत्वाच्या असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश राठी म्हणाले तर या प्रकल्पात एकही मनोरुग्ण भरती होता कामा नये अशी अपेक्षा डॉ.पटेल यांनी व्यक्त केली.घरात एकही मनोरुग्ण असल्यास त्याची काळजी घेताना अवघ्या कुटुंबांची घालमेल होते इथे तर शेकडो मनोरुग्ण उपचाराधीन आहेत.त्यामुळे हा प्रकल्प मोठा होईल,असा आशावाद डॉ.कावलकर यांनी व्यक्त केला.या दरम्यान या केंद्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम,अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत कसारे,डॉ.कविता करोडदेव,स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.हर्षलता गायनर,डॉ.प्रवीण राखुंडे,डॉ विजय मून,डॉ राधिका धलवार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार आनंद कसंबे आणि नंददीपचे दीपक सुकळकर यांचा समावेश आहे.
No comments