स्थानिक गुन्हे शाखे कडुन चार आरोपी अटक. यवतमाळ – पांढरकवडा मार्गावर तळेगाव भारी गावा लगत असलेल्या सज्जनगड टेकडीवर दोन वृद्ध व्यक...
स्थानिक गुन्हे शाखे कडुन चार आरोपी अटक.
यवतमाळ – पांढरकवडा मार्गावर तळेगाव भारी गावा लगत असलेल्या सज्जनगड टेकडीवर दोन वृद्ध व्यक्ती आज सकाळी मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. लक्ष्मण शेंडे वय ९० व पुष्पा होले वय ७६ असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सज्जनगड येथे मागील ४० वर्षापासून वास्तव्यास राहत होते मात्र आज ते दोघेही मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी एक तरुण या भागात गाई म्हशी घेवून आला होता त्याला दोघेही कुठलीही हालचाल करीत नसल्याचे आढळले त्याने तात्काळ याची माहिती गावकऱ्यांना दिली आणि आणि पोलिसांना दिली त्यानंतर येथे यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी पथकासह दाखल झाले. क्याडी नामक श्वानाच्या सहायाने येथिल पाहणी करण्यात आली.
घटनास्थळावरील परिस्थीती पाहता मृतक यांचे घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त असल्याने मृतकचा खुन केल्याचा प्राथमीक अंदाज आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय पध्दतीने विचारपुस सुरु केली त्यावेळी मृतकाकडे दैनंदीन काम करण्याकरीता गुराखी व एक महीला हे दररोज येत असतात अशी माहीती मीळाली त्यावरुन नमुद महीलेच्या बाबतीत सखोल माहिती घेतली असता सदर महीलेचा मुलगा नामे आशीष ज्ञानेश्वर लिल्हारे यास जुगार खेळण्याचा शौक असून तो मागील दोन तीन दिवसापासून सतत जुगार खेळायला जात आहे व घटनेच्या रात्री पहाटेपर्यंत तो घरी नव्हता अशा माहितीवरुन स्थागुशा चे पथकाने आशीष ज्ञानेश्वर लिल्हारे वय २२ वर्ष रा. खानगांव यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार नामे शुभम सुभाष बैठवार वय २५ वर्ष,सुरज सुभाष बैठवार वय २४ वर्ष दोन्ही रा. खानगांव , अशोक पांडुरंग भगत वय ५१ वर्ष रा. काल यांचे सोबत गुन्हयाचा कट रचुन केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले आले. वरील सर्व आरोपीतांनी आरोपी नामे आशीष ज्ञानेश्वर लिल्हारे याचेवर सहा ते सात लाख रुपयांचे कर्ज झालेले होते व मृतकाकडे नेहमी भरपुर पैसा असतो अशी परिसरातील लोकांमध्ये चर्चा असल्याने त्यांनी कर्ज फेडण्यासाठी पैसे मीळतील म्हणुन दोन्ही मृतकांचा गळा आवळुन खुन केला व त्यानंतर घरात चोरी केली अशी कबुली दिली आहे.
सदर गुन्हयात चारही आरोपीतांना सहा तासात निष्पन्न करुन पुढील तपासकामी पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण चे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण हे करीत आहेत.
सदरचा अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचा आव्हानात्मक गुन्हा अवघ्या सहा तासाचे आत उघडकीस आणला असुन सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक,पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ ,संजय पुज्जलवार. पो. नि. स्थागुशा, आधारसिंग सोनोने, पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण, प्रकाश तुनकलवार, सपोनि विवेक देशमुख, सहा. फा. बंडु डांगे, पोहवा साजीद सैयद, अजय डोळे, निलेश राठोड, रितुराज मेडवे, पोशी धनंजय श्रीरामे, सर्व स्थागुशा तसेच सायबर सेल यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
No comments