Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

अस्तित्व फाउंडेशन तर्फे वृद्धाश्रमा व कारागृहात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा.

यवतमाळ : समाजकार्याचा वसा घेतलेल्या अस्तित्व फाउंडेशन तर्फे यवतमाळ येथील मातोश्री वृद्धाश्रमात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्...


यवतमाळ :
समाजकार्याचा वसा घेतलेल्या अस्तित्व फाउंडेशन तर्फे यवतमाळ येथील मातोश्री वृद्धाश्रमात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये वृद्ध महिला व पुरुष यांचे पाय धुवून त्यांच्या चरणावर फुले अर्पण करून मातृ पितृ पूजन करण्यात आले .त्यांना सन्मानाने फुलांच्या पाय घडीवरून आदराने बसवून राखी बांधून त्यांची आरती करण्यात आली. 
तसेच वृद्धाश्रमातील महिला व पुरुष कर्मचारी यांना देखील राखी बांधण्यात आली. व अस्तित्व फाउंडेशन तर्फे सकाळचा नाश्ता देण्यात आला. एकत्रित कुटुंब पद्धती लोप पावत असल्यामुळे वृद्धाश्रमाचा उगम झाला आहे घरातील वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रम नावाच्या कारागृहात ठेवण्यात येत आहे अशा वृद्ध माता-पितांना अस्तित्व फाउंडेशन द्वारे एक मायेचा आधार म्हणून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला.त्यापैकी काही वृद्धांची आजपर्यंत असा मान सन्मान देऊन कोणीही रक्षाबंधन साजरा केला नाही अशी प्रतिक्रिया होती. त्या सर्व वृद्ध माता-पित्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू सामावलेले होते. वृद्धाश्रमातील वृद्धांना फक्त प्रेम व आपुलकी हवी आहेआहे. कोणीतरी आपलं असावं असे वाटते. एका वृद्ध आजोबांची व्यथा ऐकताना सर्वांचे डोळे पाणावलेले होते त्यांचे असे म्हणणे होते की आम्हाला काही नको परंतु तुमचे प्रेम आणि तुमची साथ हवी आहे जीवनाला कंटाळलेल्या वृद्धांना फक्त मायेची व प्रेमाची गरज आहे ती थोडीफार देण्याचा प्रयत्न अस्तित्व फाउंडेशन ने केलेला आहे.
तसेच फाउंडेशन द्वारा
“बीज लगाओ’ पेड उगाव”
ही संकल्पना लक्षात घेऊन वृद्धाश्रमात फळझाडांचे बिजारोपण करण्यात यात प्रामुख्याने फणस आंबा जांभूळ पेरू नींबू अशा पाच प्रकारचे फळझाडांच्या बिया रोवून बिजारोपण करण्यात आले त्यानंतर यवतमाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी व व कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी मॅडम यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सौ अलका कोथळे करुणा धनेवार डिंपल नक्षणे वर्षा लाखानी सरोज बरदेहे सरला इंगळे दीपा तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

No comments