आर्णी:- तालुक्यातील नाथनगर येथील भिक्षा माघुन पोट भरणा-या समाजातील भंडारी नाथनगर येथील राजेश नारायन सोळंके या युवकाने ...
आर्णी:-
तालुक्यातील नाथनगर येथील भिक्षा माघुन पोट भरणा-या समाजातील भंडारी नाथनगर येथील राजेश नारायन सोळंके या युवकाने हालाकीचे शिक्षण घेवुन भविष्याचे स्वप्न रंगवीत असतांना त्याने आपण देश सेवेसाठी काहीतरी सेवा समप्रित केली पाहीजे आपले वडिल परिवारासाठी संपुर्ण भारत भ्रमंती करुन भिक्षा मागण्यासाठी कोठेही भ्रमतिंत असतात त्यासाठी आपणच संपुर्ण देशासाठीच सेवा केली पाहीजे.
या धेय्याने पझाडलेल्या आर्णी तालुक्यातील नाथनगर भंडारी या गावातील राजेश सोळंके या विस वर्षीय युवकाने मणात निश्चय करुन आपण देश सेवेत गेलो पाहीजे यासाठी आपल्या परिवारा कडुन व गावातील मित्र परीवाराकडुन पंसती मिळताच नविन निघलेल्या अग्निविर जवानाचे जाहीरातीचे फार्म भरताच त्याने कठीनात कठीन परिक्षा पास करुन केंद्र सरकारच्या अग्निवीर होण्यासाठीच्या हैद्राबाद येथिल प्रशिक्षण परिक्षा पुर्ण करुन राजेशने गावातील आपल्या मित्र परिवाराला मी दिनांक ७/८/२०२३ रोजी मी आर्णीला तालुक्याच्या ठिकाणी पोहचत असल्याची माहीती दिली तर गावातील आपल्या परिवारातील सदस्यासह मित्र परिवार यांनी राजेश सोळंके आर्णी शहरातील बसस्थानकात पोहचताच तेव्हा पासुननच त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.तेथुन काही अतंरावर असलेल्या आपल्या गावी
नाथजोगी समाजाचे गाव म्हणून भांडारी जहागीर या.
गावातील रमेश सोळंके , संजय चव्हाण , राम शितोळे , काशिनाथ शेगर , सीताराम तांबे ,अकुश शेगर,व गावचे ग्रामसेवक दिनेश तनमने इत्यादी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
पुढे तो येत्या काही दिवसात तो बारामुल्ला ( श्रीनगर ) येथे तोफखाना रेजिमेंट म्हणून रुजू होत आहे. बहुदा राजेश हा तालुक्यातील पहिलाच अग्निविर असल्याने त्याचेवर गावकरी,आप्तेष्ठांनी,मित्रपरिवारा कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments