चंद्रपूर ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुर...
ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करणे या मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी, तिसऱ्या दिवशी रविंद्र टोंगे यांची पत्नी व सहा महिन्यांचा अनिस यांनी सुद्धा दिवसभर अन्न त्याग आंदोलनात साथ दिली.
दिवसभरात ओबीसी समाजबांधवांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. भाजपचे देवराव भोंगडे, राहुल पावडे, आशिष ताजने कोरपना, मनोज पोतराज,ओबीसी जनगणना परिषद चे बळीराज धोटे, भावसार समाजाचे डॉ नंदकिशोर नंदवलकर व त्यांचे सहकारी, तैलीक समाजाचे, ऍड विजय मोगरे, रघुनाथ शेंडे, बबनराव फंड, प्रकाश देवतळे, डॉ विश्वास झाडे, काँग्रेस ओबीसी सेल चे प्रशांत दानव, उमकांत धांडे, प्रा संजय बेले, जनविकास सेनेचे अध्यक्ष पपू देशमुख, घनश्याम येरगुडे, विमल पिदूररकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समर्थन जाहीर केले.
No comments