आमदार ॲड.निलय नाईक यांच्या प्रयत्नांना यश पब्लीक पोस्ट प्रतिनिधी पुसद: शहरांमध्ये विविध प्रकारचे विकास कामे करण्यासाठी वैशिष्ट...
आमदार ॲड.निलय नाईक यांच्या प्रयत्नांना यश
पब्लीक पोस्ट
प्रतिनिधी
पुसद: शहरांमध्ये विविध प्रकारचे विकास कामे करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी खेचून आणण्यात भाजपाचे विधान परिषद सदस्य आमदार ॲड.निलय नाईक यांच्या प्रयत्नाला यश आले असून शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे. परंतु हा निधी योग्य ठिकाणी वापरून योग्य कंत्राटदाराच्या माध्यमातून कामे करावी अशी पुसद शहरातील जनतेची अपेक्षा आहे.
आजपर्यंत शहरात झालेल्या कामाची गुणवत्ता तपासली तर शासनाचा कोट्यावधीचा निधी वाया गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यामुळे या विकास निधीचा योग्य वापर होतो की नाही व या कामाच्या दर्जाबाबत आमदार महोदयांनी संबंधित कंत्राटदारावर लक्ष देऊन कामे योग्य दर्जाचे करून घेतले पाहिजे. नगर परिषद क्षेत्रात सिमेंट रस्ते सिमेंट नाल्या अनेक कामे मंजूर झाली आहेत त्यामध्ये या कामाच्या गुणवत्ता व दर्जा बाबत नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत. शहराच्या विकास कामासाठी आता मंजूर झालेल्या निधीमध्ये प्रभाग क्र.२,५,व १४,मधील विविध कामासाठी पाच कोटी तर प्रभाग क्रमांक १०,११,१५ मध्ये विविध विकास कामासाठी पाच कोटी रुपये असा एकुण १० कोटीचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून उपलब्ध झाला आहे आ.ॲड.निलय नाईक यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्यांचे कौतुक सर्व स्तरातुन केले जात आहे.
No comments