Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

"त्या" पाऊलखुणा बिबट्याच्या नसून तरसाच्या आहेत

शिवदास जामोदे  अकोला :-  बाळापूर तालुक्यातील व्याळा पेठ शेतशिवरात बिबट्याचे ठसे दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. शेतात...




शिवदास जामोदे 
अकोला :- 
बाळापूर तालुक्यातील व्याळा पेठ शेतशिवरात बिबट्याचे ठसे दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. शेतात बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र हे ठसे बिबट्याचे नसून, तरस या वन्यप्राण्याचे असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरीक व शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. 
   व्याळा पेठ शेतशिवारात (ता.१४ सप्टेंबर) रोजी रात्री ही घटना घडली होती. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्याळा पेठ शेतशिवार गाठत पाहणी केली. पाऊलखुणा ह्या बिबट्याच्या नसून बिबट्या सारखा दिसणारा प्राणी तरसाच्या असल्याचे तपासातून आज समोर आले आहे. शेतात दिसलेला प्राणी हा बिबट्या नसून तो तरस असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
        बाळापूर तालुक्यातील व्याळा, रिधोरा, गायगाव, बोराळा बोरवाकडी शेतशिवारात बिबट्याचा वावर नसल्याने शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, तो बिबट्या नसून तरस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बिबट्या हा मनुष्यावर किंवा जनावरांच्या मानेवर झडप मारून जखम करतो. त्याच्या पाऊलखुणा ह्या चौकोनी असतात. त्यामुळे व्याळा पेठ शेतशिवरात परिसरात बिबट्याचा वावर नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासात निष्पन्न केले असल्याची माहिती अकोला वनविभागाकडून देण्यात आली आहे.

शेतात जातांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जाताना बॅटरी जवळ ठेवावी. वन्य प्राणी दिसल्यास हुसकावण्यासाठी काठी सोबत ठेवावी. प्राण्यावर हल्ला करू नये. तरस मनुष्याची शिकार करत नाही. परंतु लहान मुलांनी त्याच्याजवळ जाऊ नये. वनविभागाची मदत आवश्यक असल्यास वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाळापूर तालुक्यातील व्याळा पेठ शेतशिवरात बिबट्याचा वावर असल्याचे एका शेतकऱ्याला रात्री दिसून आल्याने परिसरात वनविभागाकडून पाहणी करण्यात आली.त्या पाऊलखुणा बिबट्याच्या नसून तरसाच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. परीसरात बिबट्याचा वावर नाही.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये.
व्ही.आर.थोरात 
वनक्षेत्रपाल,वनविभाग अकोला.

No comments