यवतमाळ (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते हरिदास मेश्राम यांची कन्या कु. शुभांगी मेश्राम हिची महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ...
यवतमाळ
(प्रतिनिधी)
येथील सामाजिक कार्यकर्ते हरिदास मेश्राम यांची कन्या कु. शुभांगी मेश्राम हिची महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्र पावर स्टेट जनरेशन कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीत ज्युनियर ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यात येणाऱ्या पाथरड गोळे येथील रहिवासी असलेले हरिदासजी मेश्राम यांची ती कन्या असून लहानपणापासूनच तिची अभ्यासू वृत्ती व अभ्यास करण्याची जिद्द कायम होती. विशेष म्हणजे तिला सैनिकी सेवा किंवा पोलीस प्रशासनात जाण्याची आवड तिच्यामध्ये लहानपणापासूनच होती. त्यामुळे खेळ हे तिचे आवडीचे क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. तिच्या निवडीचे श्रेय ती आपले आई-वडील व गुरुजनांना देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामध्ये असणारे अधिकारी आपण व्हावेत ही तिची लहानपणापासून इच्छा होती. तिची निवड झाल्यानंतर गावकऱ्यांनी तिची विजयी मिरवणूक काढली. सर्वप्रथम पाथरड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नतमस्तक होऊन ही मिरवणूक संपूर्ण गावांमध्ये निघाली. पाथरड गोळे या ठिकाणी पहिली महिला ऑफिसर म्हणून निवड झाल्याचा मान तीने पटकाविला असून तिच्या निवडीबद्दल समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळ, स्मृतीपर्व, लॉर्ड बुद्धा चॅनल परिवार तसेच अनेक सामाजिक संघटनांकडून तीच कौतुक केल्या जात आहे.
No comments