Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस येथे स्त्री शक्ती सन्मान सोहळा

 * *शिवसेना महिला आघाडी चा पुढाकार. * दिग्रस :-  मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्...


 *
*शिवसेना महिला आघाडी चा पुढाकार.
*दिग्रस :-  मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधना निमीत्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा‘ विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार सोहळा शिवसेना महिला आघाडी दिग्रस तर्फे सोमवार ता.११ सप्टेंबर २०२३ ला सकाळी ११ वाजता स्थानिक बापुनगर येथील जिजामाता सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला,
 महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने सुरवात झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षा श्रीमती सीमाताई भानूदास शिंदे, प्रमुख उपस्थीत माजी नगरसेवीका वैशाली दुधे, लक्ष्मी पवार, रचना जाधव, अल्का तोडासाम, जोत्सना दुधे यांच्या हस्ते पालकमंत्री संजय राठोड यांच्या तर्फे रक्षाबंधनची भेट म्हणून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, अधिपरीचारिका,आरोग्य सेविका, आशा गट प्रवर्तक यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवळपास चारशे महिलांचा प्रमाणपत्र, शुभेच्छापत्र व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक संजिवनीताई शेरे, तालुका संघटक दुर्गाताई दुधे, शहर संघटक वर्षाताई निगोट, माधुरी महल्ले, माला लोखंडे, प्रविणा अस्वार, जोत्सना वाघोडे, शितल होडगीर, सारीका कणसे, माधुरी झंजाड, वैषाली अस्वार, साधना दुर्शेटवार, सवीता आडे, पूजा जाधव, सवीता वाघमारे, जया गजभार, सोनाली विरेकर, संगीता वानखडे, सुनीता दातीर, जिल्हानियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, तालुका प्रमुख उत्तम ठवकर, मीलींद मानकर, विनोद जाधव, अजय भोयर, नितीन सोनुलकर, मनोज पवार,सुभाष जाधव ,सुनील सुरस्कर, बाळू जाधव, दिगंबर जाधव, अनिरुद्ध राठोड, निलेश आडे, निलेश भिसे आदी मान्यवर मंडळी उपस्थीत होती.  अल्पोहार व चहापाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शिवसेना महिला आघाडीने पूढाकार घेतला होता.
                ना. संजय राठोड यांचा शुभेच्छा संदेश .
आईचं प्रतिरूप ग्हणजे बहिण : प्रिय ताई, आईचं प्रतिरूप ग्हणजे बहिण, बहिणीची वेडी माया भावाला कायम सावलीसारखी भासते, तर भावाचे प्रेम बहिणीच्या मनात नेहमीच एक सुरक्षाकवच आणि माझा पाठीराखा भाऊ आहे ही भावना तेवतठेवते, बहीण-भावाचं हे अनोखं नात जगाच्या पाठीवर म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रेमळ लटका राग,अधेमधे चालणारी धुसफूस आणि त्यापेक्षा आधिक प्रेम व आपण एकमेकांसाठी आधार आहोत ही भावनाच हे नातं सर्वश्रेष्ठ ठरवते, अशा या बहीण-भावाच्या अनोख्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, खरंतर ‘भावबंध हे रेशमाचे बहिणीच्या रक्षणाचे‘ असं म्हटलं तर वावगं ठरु नये. माझ्या ताईला रक्षाबंधनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! आजपर्यंत आपले आशिर्वाद आणि बळ यामुळेच तुमच्या या भावाचीवाटचाल सुसह्य झाली आहे. आपला स्नेह, आशिर्वाद माझ्या पाठीशी असाच कायम असू द्यावा हीच या रक्षाबंधनानिमित्त विनंती. माझी बहीण कुठल्याही अडचणीत, संकटात असो किंवा तिच्या कुठल्याही सुख-दुःखात या भावास हक्काने आवाज द्या, हा भाऊ तुमच्यासाठी क्षणात हजर होईल. हीच ओवाळणी समजून रक्षाबंधनानिमित्त आपले बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करुया. रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छासह. घरातील सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार. आपला भाऊ संजय राठोड. काही करणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याने असे शुभेच्छा संदेश पत्र साडीचोळी सोबत प्रत्येक बहिणीला राज्याचे मृद व जलसंधारन मंत्री तथा यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पाठविले .
सोबत फोटो :  प्रमाणपत्र, साडीचोळी , मिठाई व शुभेच्छा संदेश पत्र देऊन स्त्री शक्तीचा सन्माण करतांना मान्यवर महिला मंडळी.
कार्यक्रमाला उपस्तित विविध क्षेत्रातील कतृत्वान महिला भगिनी.

No comments