बाभूळगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वसंतराव नाईक विद्यालय आसेगाव देवी येथे दि. २६ रोजी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा यशस्वीरीत्य...
बाभूळगाव
प्रतिनिधी:- तालुक्यातील वसंतराव नाईक विद्यालय आसेगाव देवी येथे दि. २६ रोजी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. या स्पर्धेत मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालय बाभुळगावच्या मुलींनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर पुढील महिन्यात जीह्लास्तारीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्यात ही चमू सहभागी होईल.
या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एन. डाबरे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन व व्यवस्था शाळेचे शारीरिक शिक्षक बी. आर. दयावर्तीवार यांनी केले. या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक विद्यालय आसेगाव देवी, प्रताप विद्यालय बाभुळगाव, मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालय बाभुळगाव, स्वामी विवेकानंद विद्यालय चिमणाबागापूर, तथागत विद्यालय कोटंबा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १७ वर्षाआतील मुलांमध्ये प्रताप विद्यालय बाभुळगावने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर १७ वर्षाआतील मुलींमध्ये मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालय बाभुळगावने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या चमूमध्ये स्नेहल मोहाड, दक्षिता मालखेडे, अनुराधा चिकटे, माहेश्वरी बुल्ले, नाजुका कोत्रे, पायल देशमुख, मनीषा कावडकर, रागिणी माहुरे, आर्या बऱ्हाणपूरे, नेहा राऊत, पल्लवी घोडे, नीलाक्षी खडसे, नंदिनी भगत, सायली भोयर, स्नेहा खोडके यांचा समावेश होता. त्यांना प्रशिक्षक शुभम कडू यांचे मार्गदर्शन लाभले. या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वसंतराव नाईक विद्यालयचे सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. आभार तालुका क्रीडा संयोजक मनोज राठोड यांनी मानले.
No comments