पब्लिक पोस्ट वृत्तसेवा एक दिवस पृथ्वीवरील सर्व काही नष्ट होईल असा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे. ब्रिस...
पब्लिक पोस्ट
वृत्तसेवा
एक दिवस पृथ्वीवरील सर्व काही नष्ट होईल असा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर सिम्युलेशन्स तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटाच्या तारखेचा अंदाज वर्तविला असून नेचर जिओसायन्स मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यात तापमानाचा परिणाम मानवी जीवनावर होईल का?अशा प्रकारचे संशोधन सुरू होते, तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे अंटार्टिका म्हणजेच बर्फाळ प्रदेशातील बर्फ सुद्धा आता वितळायला लागले आहेत ही भीती निर्माण झालेली होती. यावरून शास्त्रज्ञांचे शोध मोठ्या प्रमाणात सुरू होते. पृथ्वीवरील सर्व महाद्विप मिळून एक सुपर कॉन्टिनेटची निर्मिती करेल ज्याला पॉजीया अल्टिमा म्हणून ओळखलं जाईल. पृथ्वीचा बहुतेक भाग समुद्रात बुडेल. हजारो वर्षांनी प्रत्येक महाद्वीपावर एक आग लागलेली असेल. ही प्रलयाची सुरुवात असेल. टेकटनिस प्लेट्स आपसात धडकतील आणि ज्वालामुखीचे स्फोट होईल यामुळे वातावरणात कार्बनडायऑक्साइड जास्त उत्सर्जन होईल आणि पृथ्वी अधिक गरम होईल सूर्याची किरण आगीत तेलांसारखी काम करतील. तेव्हा कार्बन-डाय-ऑक्साइड ची पातळी आज पेक्षा दुप्पट असेल व मानवाला श्वास घेणे सुद्धा कठीण होऊन जाईल. यावेळी महाप्रलय घटनेची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.
दिवसेंदिवस पृथ्वीवरील पर्यावरणाचा ऱ्हास होत असून प्रत्येक माणसाने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. येणारा काळ अत्यंत आव्हानात्मक असून एक दिवस पृथ्वीचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही.तुमच्या हातामध्ये आता येणाऱ्या पिढींचे भविष्य आहे.
पृथ्वी इतकी तापील की सर्व काही नष्ट होईल,त्यामुळे पृथ्वीवर जिवंत राहणाऱ्या कोणत्याही जीवाला 70 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल. हे सहन करण्याची क्षमता माणसांमध्ये नसेल. या अभ्यासाचे असणारे संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर अलेक्झांडर फार्मस्वर्थं म्हणाले की, सामान्यपणे गर्मीच्या दिवसात घाम निघून माणसाचा शरीर थंड रागत पण तेव्हा असं होणार नाही त्यामुळे शरीर इतकं गरम होईल की माणसाचा मृत्यू होईल. फक्त 8 ते 16 टक्के जमीन स्तनधार्यांसाठी राहण्यायोग्य राहील पण त्यासाठी स्तनधारी जिवंत नसतील. सर्व स्तनदारी प्रजाती नष्ट होतील.आज पासून 250 दशलक्ष वर्षानंतर हे सर्व काही घडेल. या अभ्यासात जीवाश्म इंधनाचा ज्वलनामुळे तयार होणार कार्बन डाय-ऑक्साइड चा विचार केला नाही आहे. त्याचा विचार केला तरी संकट खूप आधी येईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे असून येणाऱ्या काळात पर्यावरण सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.
No comments