वाशीम दि.27:(अजय ढवळे ) समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव...
वाशीम दि.27:(अजय ढवळे )
समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून नागरिकांच्या मालमत्तेची चोरी/नुकसान करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाते. घातक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या १० दरोडेखोरांना दरोड्याच्या साहित्यानिशी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश प्राप्त झाले आहे.
दि.२५.०९.२०२३ रोजी रात्री पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांना गोपनीय माहिती कि, ग्राम पांगरी धनकुटे ते काटा रोड वरील रेल्वे पुलाच्या समोर काही इसम संशयितरीत्या एक बोलेरो चारचाकी वाहन व काही दुचाकी घेऊन घातक शस्त्रांसह कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसले आहेत. वरील प्राप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले व पंचासह सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार नमूद ठिकाणी काही इसम त्यांचे मोटारसायकल व एक बोलेरो कारने रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पडीक जागेमध्ये शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देश्याने दबा धरून बसले असल्याची खात्री झाल्याने पोलीस पथकांनी त्यांना घेराव घालून १० दरोडेखोरांना जागीच ताब्यात घेतले तर काही इसम हे अंधाराचा फायदा घेऊन शेतशिवारामध्ये पळून गेले. पकडलेल्या दरोडेखोरांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) विनोद मच्छिंद्र चव्हाण, वय ३० वर्षे, २) शुभम अनंता चव्हाण, वय २० वर्षे, ३) आकाश नामदेव काकडे, वय २४ वर्षे, ४) गौतम भगवान गायकवाड, वय ३८ वर्षे, ५) संदीप मच्छिंद्र चव्हाण, वय ४० वर्षे, १ ते ५ सर्व रा.डव्हा, ता.मालेगाव, जि.वाशिम, ६) राहुल विश्वास पवार, वय २२ वर्षे, रा.सुदी, ता.मालेगाव, जि.वाशिम ७) रवी डीगांबर पवार, वय २८ वर्षे, रा.आमखेडा, ता.मालेगाव, जि.वाशिम, ८) लक्ष्मण भागवत चव्हाण, वय ४९ वर्षे, रा.धारकाटा, ता.मालेगाव, जि.वाशिम, ९) विशाल जगदीश पवार, वय २१ वर्षे, व १०) राधेश्याम चुनिलाल पवार, वय २९ वर्षे, क्र.९ व १० रा.सावरगाव बर्डे, ता.मालेगाव, जि.वाशिम असे सांगितले. पकडलेल्या दरोडेखोरांच्या पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्या ताब्यातून दरोडा टाकण्याकरिता लागणारे साहित्य लोखंडी कत्ता, धारदार चाकू, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, वेळूच्या काठ्या, मिर्ची पावडर मिळून आले तसेच चारचाकी गाडी बोलेरोची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाची दोरी, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर मिळून आले. सदर दरोडेखोरांच्या ताब्यातून १ बोलेरो चारचाकी, १३ मोटार सायकली, ०७ मोबाईल संच व वर नमूद साहित्य असा एकूण १३,०६,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर दरोडेखोरांवर पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथे अप.क्र.४३४/२३, कलम ३९९, ४०२ भादंवि सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.रमाकांत खंदारे, जगदीश बांगर, पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.बाळू कंकाळ, गजानन अवगळे, गजानन झगरे, दिपक सोनवणे, कविता गायकवाड, पोना.प्रशांत राजगुरू, अमोल इंगोले, राजेश राठोड, ज्ञानदेव मात्रे, प्रवीण राऊत, राम नागुलकर, गजानन गोटे, महेश वानखेडे, संगीता शिंदे, पोशि. निलेश इंगळे, अविनाश वाढे, विठ्ठल सुर्वे, शुभम चौधरी, विठ्ठल महाले, दीपक घुगे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी पार पाडली. जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून अश्याप्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जात आहेत. नागरिकांनी बेकायदेशीर बाबींची माहिती DIAL 112 वर कॉल करून कळवावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
No comments