Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात पिसिएल हायस्कूलची जिल्हास्तरावर निवड

दाभा(प्रतिनिधि) शिक्षणाधिकारी व विभागीय समन्वयक राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव,नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्य...



दाभा(प्रतिनिधि)
शिक्षणाधिकारी व विभागीय समन्वयक राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव,नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये पीसीएल हायस्कूल दाभा येथील विद्यार्थ्यांनी आज झालेल्या नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला व त्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली.
विज्ञान नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्याना वैज्ञानिक माहिती मिळावी तसेच घटना आणि संकल्पना मनोरंजन पद्धतीने देता यावी याकरिता शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ तथा राष्ट्रीय विज्ञान नाट्य  महोत्सव व नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी पीएमबी इंग्लिश मीडियम स्कूल बाभुळगाव या ठिकाणी तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य स्पर्धेमध्ये मिलेटचा आहारामध्ये उपयोग, खाद्य सुरक्षा, दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सेवेतील सध्याची वर्तमान प्रगती व समाजातील अंधश्रद्धा या विषयावरती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पिसिएल हायस्कूल दाभा येथील विद्यार्थ्यांनी मिलेटचा आहारामध्ये उपयोग या विषयावर आधारित आपले नाट्य सादर केल्यानंतर तालुक्यातील सात सहभागी स्पर्धकांपैकी पिसिएल हायस्कूल दाभा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला  व त्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली.यावेळी बाभूळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मैदाने तसेच केंद्रप्रमुख खडसे व तज्ञ मार्गदर्शक इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धा पार पडल्यात. विशेषता यावेळी तीन स्पर्धकांना घोषित करण्यात आले त्यापैकी एशियन हायस्कूल दाभा येथील विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक देऊन त्यांचे निवड जिल्हा स्तरावर करण्यात आली. यावेळी या यशाचे श्रेय प्रा. वसंत परोपटे, मुख्याध्यापक महेंद्र ठाकूर तसेच विज्ञान शिक्षिका कुमारी विशाखा तलवारे यांना जाते. संबंधित विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड झाल्याने परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे कौतुक केल्या जात आहे.

No comments