Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

शहरातील चार सराईत (धोकादायक) गुन्हेगारांना MPDA अंतर्गतविरुध्द मोक्का

 यवतमाळ  शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शारूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूं...


 यवतमाळ 
शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शारूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जर्यावजय चौक, यवतमाळ याचा चाकुने मानेवर, छातीवर व डोक्यावर वार करून खुन करण्यात आला होता. सदर घटने संदर्भात फिर्यादी नामे रमेश श्रावण मस्के, वय ६१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जयविजय चौक, यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे दिलेल्या तक्रारीवरून शिनु शिंदे अधिक ३ ते ४ अज्ञात मुले ४ विधीसंघर्षग्रस्त बालकांविरुध्द क्र. ५०३/२०२३ कलम ३०२, १२० (ब), १४३, १४४, १४७, १४८, १४९ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात  राहुल ऊर्फ सिनु संजय शिंदे वय २३ वर्ष, रा. ताडउमरी, केळापुर, जि. यवतमाळ,  शेख रहिम ऊर्फ शेरअली मोती सैय्यद वय २४ वर्ष रा. इंदीरा नगर, यवतमाळ,  नयन सुरेश सौदागर वय २८ वर्ष रा. छत्रपती नगर, विठ्ठलवाडी, यवतमाळ  करण संजय शिंदे वय २४ वर्ष रा. ताडउमरी, केळापुर, जि. यवतमाळ,  वेदात संतोष मानकर वय २० वर्ष रा. आंबेडकर चौक, पाटीपुरा, यवतमाळ,  देवाश अजय शर्मा वय २३ वर्ष रा. गणपती मंदीर जवळ, माळीपुरा रोड, यवतमाळ,  फारुख खान ऊर्फ मुक्का बशिर खान वय २५ वर्ष रा. इंदीरा नगर, यवतमाळ,  अंजिक्य किन्हेकर वय २२ वर्ष रा. वाघापुर, यवतमाळ व ०४ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सहभाग असल्याचे व सदरचा गुन्हा कट रचुन संघटितरित्या केला असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कलम वाढीची परवाणगी मिळणे बाबत पोलीस निरीक्षक, पोस्टे यवतमाळ शहर यांनी तयार केलेला प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचेकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाला  विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परीक्षेत्र अमरावती यांनी दिनांक १४/०९/२०२३ रोजी मंजुरी दिली असल्याने सदर गुन्हयात मकाका कायदयाचे कलम समाविष्ट करण्यात आले असुन पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हे करीत आहेत. तसेच मकोका प्रकरणातील टोळी प्रमुख राहुल ऊर्फ सिनु संजय शिंदे व त्याचे टोळीतील सदस्यांवर यवतमाळ तसेच नागपुर शहरामध्ये खुनाचे एकुण ०५ गुन्हे नोंद आहेत. जिल्हयात आजपावेतो ०६ मकोका कारवाई अंतर्गत एकुण ५० आरोपीतांविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हयातील यवतमाळ शहर, अवधुतवाडी व उमरखेड पोलीस स्टेशनचे हददीत शरिराविरुध्द, मालमत्तेविरुध्द गुन्हे करुन दहशत पसरविणारे सराईत धोकादायक गुन्हेगार  पो.स्टे. अवधुतवाडी हद्दीतील अभय उर्फ बित्तम उर्फ विकास दिलीप पातोडे वय २२ रा. शिंदे नगर यवतमाळ  पो.स्टे. यवतमाळ शहर हद्दीतील साहील अली मुज्जफर अली वय २३ वर्षे रा. रामरहीम नगर, यवतमाळ जि. यवतमाळ , पोस्टे उमरखेड हददीतील आकाश रविप्रसाद दिक्षित वय २२ वर्षे रा. शिवाजी वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ,  विजय गणेश भिमेवार वय २१ वर्षे रा. शिवाजी वार्ड उमरखेड, ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचे एम.पी.डी.ए. कायदयांतर्गत जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी मंजुरी देवुन त्यांना अकोला जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहेत. जिल्हयात आज पावेतो एकुण १३ इसमांचे एम. पी. डी. ए. प्रस्तावास मा. जिल्हादंडाधिकारी यांनी मान्यता देवुन स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. सदरच्या कार्यवाही डॉ.  पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ,  पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात,  आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ.  ज्ञानोबा देवकते, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. अवधुतवाडी,  सतिष चवरे, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. यवतमाळ शहर, शंकर पांचाळ, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. उमरखेड, सपोनि प्रताप भोस, पो.स्टे. सपोनि प्रशांत देशमुख, तसेच पोउपनि धनराज हाके, पोलीस अमलदार बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघट सर्व स्थागुशा यवतमाळ, विजय पतंगे, दत्ता पवार पोस्टे उमरखेड, रवि नेवारे, अंकुश फेंडर पो.स्टे. यवतमाळ शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

No comments