< १ कथा, कविता, वैचारिक प्रबोधनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम व विचार प्रवर्तक कार्यक्रमाची मेजवानी यवतमाळ दि. येथील साहित्य ...
<
१
कथा, कविता, वैचारिक प्रबोधनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम व विचार प्रवर्तक कार्यक्रमाची मेजवानी
यवतमाळ दि.
येथील साहित्य सांस्कृतिक अकादमी तर्फे, दि. ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी राज्यस्तरीय भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील तारखेला संपन्न होत असलेल्या या राज्यस्तरीय संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द विचारवंत, वक्ते, समीक्षक व साहित्यिक प्राचार्य डॉ. श्री. अशोक पळवेकर यांची निवड करण्यात आली असून, स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत व प्रख्यात वक्त्या प्रा. डॉ. लिलाताई भेले यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रसिध्द अध्यापिका व कार्यकर्त्या श्रीमती रंजनाताई तोंडरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कथाकथन, परिसंवाद, काव्य संमेलन, गझल मुशायरा, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यान आदी भरगच्च कार्यक्रम या संमेलनात आयोजित करण्यात आले आहे. दि. ६ जानेवारी २०२४ ला सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून त्याच दिवशी दुपारी १ वाजता दिल्लीचे राष्ट्रीय किर्तीचे वक्ते श्री. अशोक वानखडे यांचे व्याख्यान होणार आहे. दि. ७ जानेवारी २०२४ ला सायंकाळी ७ वाजता संमेलनाचा समारोप होणार असून त्यानंतर लगेच महाराष्ट्रातील ख्यातनाम व लोकप्रिय गझलकारांचा गझल मुशायरा रंगणार आहे. महाराष्ट्रातील झुंजार वक्ते, परखड समाजसेवक व निर्भिड पत्रकार श्री. निखील वागळे यांची प्रकट मुलाखत हे या संमेलनाचे मुख्य आकर्षण राहणार आहे. त्याशिवाय श्री. प्रसेनजीत गायकवाड, इरफान शेख, सुरेश पाचकवडे, भरत दौंडकर, किशोर कवठे, डॉ. इक्बाल मित्रे, नरेंद्र माहुरतळे, डॉ. शोभा रोकडे, डि.बि. जगपुरीया, डॉ. जगदिश कदम, प्रा. सुषमा पाखरे, गणेश भाकरे व इतर अनेक जनमान्य श्रेष्ठ साहित्यिक या संमेलनात उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमात विदर्भातील वेगळ्या वाटा अंगीकारणारे त्यागी समाजसेवक व कर्तृत्ववान महिला भगिनींचा भावपुर्ण सत्कार केल्या जाणार आहे. दोन कवी संमेलने, दोन सांस्कृतिक कार्यक्रम सत्रे दोन परिसंवाद, कथाकथन आणि गझज मुशयारा आदि स्वरूपाचे बहारदार व विचार प्रवर्तक कार्यक्रम या प्रसंगी संपन्न होणार आहेत. लोकशाही मुल्यांपासून आणि विवेकी विचारांपासून भरकटलेल्या व भ्रमीत झालेल्या नागरिकांना विचार आणि आधारांची योग्य दिशा दाखवून त्यांना जागृत करणे हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गतानुगतिकतेवर प्रखर भाष्य करणारे आणि भविष्यातील वर्तन परिवर्तनाची सुयोग्य मुल्ये देणारे असे हे साहित्य संमेलन असणार आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ. बाळकृष्ण सरकटे यांचे अध्यक्षतेखाली प्रा. घनःश्याम दरणे, प्रा. अंकुश वाकडे, प्रमोद बाविस्कर, विनय मिरासे, मनोहर शहारे, सौ. - कल्पना मोटाळे, निलध्वज कांबळे, जयंतकुमार शेटे, मंगला माळवे, सुरेश राऊत, नारायण स्थल, प्रा. अरूण शेंडे, प्रा. कमल राठोड व चंद्रशेखर कोलते आणि इतर अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
No comments