यवतमाळ:- आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजत असताना राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालु केली आहे. कार्यकर्ता मेळावे, संव...
यवतमाळ:-
आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजत असताना राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालु केली आहे. कार्यकर्ता मेळावे, संवाद यात्रा, भेटीगाठी,गाव दौरे,सामाजिक उपक्रम यांनी धुमाकूळ घातला असुन वातावरणात राजकीय रंगत दिसुन येत आहे. तर अनेक राजकीय पक्षांनी पदाधिकाऱ्यांचे खांदे पालट करून किंगमेकर असलेल्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या पदाची जबाबदारी दिल्या जात आहे.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या जिल्हाध्यक्ष पदी युवा व सर्व सामान्यांचा बुलंद आवाज म्हणुन नावारूपास आलेल्या शहरातील डॉ.निरज वाघमारे यांना पदारूढ केलें आहे.वाघमारे यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीने जिल्ह्यातील युवा वर्ग नक्कीच वंचित कडे आकर्षित होईल व पक्षाला नवसंजीवनी प्राप्त होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
सामाजिक कार्यात अग्रेसर असतांनाच बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्य प्रणालीवर प्रभावित होवुन दोन वर्षांपूर्वी वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वंचित मध्ये प्रवेश केला होता.त्यानंतर वंचित ने जिल्ह्यात राबविलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या नियोजन व नेतृत्व गुणाची चुणूक दाखवून सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले.याचेच कौतुक करीत बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांना आदेशित करून वाघमारे यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड केली. दिनांक ११नोव्हेंबर २०२३ रोजी एका पत्रकाद्वारे ही निवड घोषित करण्यात येवुन या पदाची जबाबदारी देऊन आगामी काळात पक्ष संघटन, सामाजिक उपक्रम त्याच बरोबर समाजातील वंचित, उपेक्षित व अन्यायग्रस्तांना मदत करण्याची सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या. वाघमारे यांच्या निवडीने पक्षात चैतन्य संचारले असुन ह्या निवडीचा येत्या काळात मोठा फायदा पक्षाला होणारं असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले..
No comments